सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›व्हाइट वाटर रिव्हर राफ्टिंग’ भारतात सहीष्णा सोमवंशी ठरली पाचोऱ्यातील पहीली कन्या.

व्हाइट वाटर रिव्हर राफ्टिंग’ भारतात सहीष्णा सोमवंशी ठरली पाचोऱ्यातील पहीली कन्या.

By Satyajeet News
January 27, 2022
201
0
Share:
Post Views: 212
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०१/२०२२

इंडियन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत निमास संस्थेच्या विविध कोर्स मधील, ‘व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग’ हा कोर्स करणारी भारतात सर्वात कमी वयाची पाचोरा शहरातील सहीष्णा सोमवंशी ही पहीली कन्या ठरली आहे.

भारताच्या डीरांग अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सिमेवर भारतीय सैन्य दलाने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटनींग ए लीड स्पोर्ट्स (निमास) ही संस्था गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. या ठिकाणी भारतातुन विविध राज्यांतील महीला आणि पुरुष अकरा दिवसाचा कॅम्प करण्यासाठी जातात. यात आपत्कालीन परिस्थितीत उपयोग घेण्यासाठी भारतीय लोक सक्षम असावे म्हणून हा कॅम्प इंडिया मिनिस्ट्री ऑफ डेफेन्सने बनवला असुन यात माउंटनींग, कुबा डायव्हिंग, पॅरा लायडींग, बायकींग, व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग आदी कोर्स केले जातात.

येथे शुन्य तापमान असुन हा खडतर कोर्स पुर्ण करावा लागतो. टेन्ट मध्ये राहणे, सैन्या प्रमाणे जेवण घेणे, अतिशय थंड पाण्यात राफ्टिंग करावे लागते. यासाठी पालक मुलांना पाठवण्याचे धाडस करीत नाही. परदेशात अशा कोर्सला खुपच महत्व दिले जाते. त्यात जगात व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग मध्ये इंडियन आर्मी एक नंबरवर आहे. त्यामुळे भारतीय सैन्यातील अनुभवी प्रशिक्षकांकडून हे सर्व कोर्स शिकवले जातात.

भारतातुन विशेष म्हणजे पाचोरा शहरातील फक्त १८ वर्षे सर्वात कमी वयाची सहीष्णा सचिन सोमवंशी हिने हा कोर्स करुन पहिला ठरली असल्याचा बहूमत खांन्देशाला मिळवून दिला आहे. सहिष्णाच्या या यशामागे तिचे वडील कॉंग्रेसचे अध्यक्ष मा.श्री. सचिन सोमवंशी व आई सौ.सुप्रिया सोमवंशी व आजी, आजोबांचा सहभाग व योग्य मार्गदर्शन कामी आले असे ती सांगते.

सहीष्णा सोमवंशी ही ज्या टिम मध्ये गेली त्यात अकरा महीला सदस्यांचा सहभाग होता. यात शुन्य तापमानामध्ये हा खडतर कोर्स करावा लागतो. यात रेस्क्यू ऑपरेशन शिकवले गेले आहे. प्रशिक्षण घेतांना येथे वास्तव्य करणेही आव्हानात्मक आहे. तब्बल सहा ते सात हजार कि.मी.चा प्रवास येथे जाण्यासाठी करावा लागतो.

(सहाष्णा ही पाचोरा शहरातील दत्त कॉलनीमध्ये निवसस्थानी येणार असल्याचे समजताच दत्त कॉलेजमध्ये जणू दिवाळीच साजरी होते आहे की काय असे वातावरण तयार झाले होते. कारण सहिष्णाच्या स्वागतासाठी दत्त कॉलनीत निवासस्थानी रांगोळ्या सजवण्यात आल्या होत्या तसेच सहिष्णाचे दत्त कॉलनीत आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेला होता.)

प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर विश्वास ठेऊन हा कोर्स करण्यासाठी उत्तेजित करावे या कोर्स मुळे प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. येणाऱ्या काळात ज्यांना हा कोर्स करायचा त्यांना मी मार्गदर्शन करेल असे सहीष्णा सोमवंशी हीने सांगितले. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्य़ातील जे विद्यार्थी हा कोर्स करतील त्या विद्यार्थ्यांसाठी अनुदान उपलब्ध करुन द्यावे, जेणेकरून येणाऱ्या काळात होतकरु विद्यार्थी, युवक, युवती, यांच्याम आत्मविश्वास वाढेल आणि भावी पिढी चांगली निर्माण होण्यासाठी मदत होईल अशी आशा सहीष्णा ने व्यक्त केली आहे. तिच्या या धाडसाचे व यशाचे सर्वत्र कौतुक होत असून संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कमी’ तापमानात अनवाणी फिरणाऱ्या जैन ‘मुनिश्री’ म.साहेब ...

Next Article

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीणजी मुंढे यांना कोरोनाची ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने अनाथ मुलांना कपडे व मास्क वाटप.

    June 30, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    अंधारी परिसरात अद्रकचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल, झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ.

    December 28, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट

    February 12, 2023
    By SURAJ DEOHATE
  • महाराष्ट्र

    धक्कादायक तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू.जालना जिल्हयातील घटना.

    November 19, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयातील खेळाडूंची ग्राफ्लींग कुस्ती क्रीडा प्रकारात राष्ट्रीय आणि कुस्ती प्रकारात राज्य पातळीवर निवड.

    August 30, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    औरंगाबाद शहरामध्ये आज आगळी वेगळी शिवजयंती साजरी रस्त्यावरील भिकार्रांचा केला कायाकल्प. सुलक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपचा स्तुत्य ...

    February 19, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    कुऱ्हाड व लोहारा परिसरात अवैधधंद्यांचा सुळसुळाट, पो.हे.कॉ. निवृत्ती मोरे यांची बदली करा. शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. तानाजी पाटील यांची मागणी.

  • सांस्कृतिक

    ४ जूनला कुसुम्ब्यात प्राकृत दिनानिमत्त ग्रंथदिंडी व पालखी सोहळा.

  • पाचोरा तालुका.

    सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा कारभार म्हणजे, आंधळ दळतय आणि कुत्र पिठ खातय.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज