सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मनमानीला न्यायालयाची चरपाक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप उत्तम पाटील हे रुजु झाल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला मनमानी कारभार सुरु झाला होता. तसे सर्वप्रकारचे अवैधधंदे मोठ्या प्रमाणात सुरु होते. तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील गावागावातून काही वाद झाल्यास अन्यायग्रस्त व्यक्ती पोलिस स्टेशनला तक्रार घेऊन गेल्यावर त्याला न्याय मिळणे तर दुरच परंतु संबधितांचे काहीही ऐकून न घेता अरेरावी करणे, धमकावणे, आम्ही रिकामे आहोत का असे बोलून तक्रारदाराला हाकलून लावणे असे प्रकार घडत होते. तर कधीकधी पैसा कमावण्याच्या नादात फिर्यादीलाच आरोपी करणे, अवैधधंद्याचे तसे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराचे विरोधात आवाज उठवणारांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे असा प्रकार सुरु होता.
याच कालावधीत सातगाव डोंगरी येथील एक समाजसेवक ज्ञानेश्वर पुंडलिक आहिरे (धोबी) हे होतकरू असल्याने अनेकांचे प्रश्न सोडवणे, गावातील अनिष्ट व अवैधधंद्याना विरोध करणे गावातील वाद गावातच मिटवणे अशी भूमिका बजावत असल्याने गावात त्यांना चांगल्याप्रकारे मानसन्मान आहे. म्हणून पोलिस स्टेशनला काही भांडण गेल्यावर ज्ञानेश्वर आहिरे हे आपसात भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न करत होते.परंतु यांच्या या मध्यस्थीमुळे संदीप पाटील यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे ज्ञानेश्वर आहिरे यांच्याबद्दल मनात आकस ठेवून वागत होते.
याच कालावधीत ज्ञानेश्वर आहिरे यांनी गावातील शासकीय जमीनीच्या बेकायदेशीर हस्तांतराबाबत चौकशी व्हावी म्हणून पोलिस विभागीय अधिकारी व पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये म्हणजे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे अर्ज दिलेला होता. परंतु हाव विषय गटविकास अधिकारी यांच्या अखत्यारीत असल्याने संदीप पाटील यांनी ज्ञानेश्वर धोबी यांना गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारीचे निवारण करण्यासाठी समज दिली.
परंतु ज्ञानेश्वर धोबी यांनी संदीप पाटील यांच्याकडे दिलेले अर्जफाटे व नोटीसांचा याचा राग मनात ठेवून वागू लागले. व मी ज्ञानेश्वर धोबी याला खोट्या गुन्ह्यात गुंतवल्याशिवाय रहाणार नाही असे सातगाव डोंगरी गावातील नागरिक व ज्ञानेश्वर धोबी संबंधित लोकांना बोलू लागले. व पोलिस बळाचा गैरवापर करत ज्ञानेश्वर धोबी यांना जाणीवपूर्वक नेहमी पोलिस स्टेशनला बोलावून त्रास देत चौकशी बाबत दिलेला अर्ज मागे घेण्यासाठी दबाव तंत्र सुरु केले, मात्र दबावाला बळी न पडता संदीप पाटील यांच्या म्हणण्यानुसार वागण्यास नकार दिला म्हणून बळाचा गैरवापर करुन कट, कारस्थान रचून स्वतः फिर्यादी विरुद्ध पोलिस स्टेशनला एन.सी.दाखल करून घेत कायद्याची महिती असलेल्या ज्ञानेश्वर धोबी बदनामी केली असे खोट्या आशयाची एन.सी.रजिस्टरला नोंद करत एन.सी.च्या फिर्यादी विरुद्ध गैरकृत्य केल्याचा आरोप आहे.
तसेच सातगाव डोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पुंडलिक अहिरे यांच्याविरुद्ध खोटे दस्तावेज तयार करून तसेच पदाचा दुरुपयोग करून पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप उत्तम पाटील यांनी सतत त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. एपीआय संदीप पाटील यांच्या विरोधात ज्ञानेश्वर अहिरे यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला होता. मात्र त्या वेळी गुन्हा दाखल करून घेतला नाही. शेवटी ज्ञानेश्वर अहिरे यांनी न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने संदीप पाटील यांच्या विरुद्ध कलम ४६५, ४६७, ४६८, २०२, ५०० अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.