पाचोरा तालुक्यात भाजप, सेनेची अशीही जुगलबंदी. राजुरी गावात विकासाची नांदी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०१/२०२२
राजकारणात एकमेकांचे विरोधक असलेतरी या विरोधाचा विकासकामात कुठेही गतिरोधक न बनवता भडगाव, पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील व नावाप्रमाणे मधुर वाणीने सगळ्यांनाच आपलेसे करून घेणारे जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर भाऊ काटे यांनी पाचोरा तालुक्यातील राजुरी या गावात जिल्हापरिषद व आमदार फंडातून भरघोस निधी देत या निधीतून राजुरी गावासाठी विविध योजनांचे उदघाटन व भूमीपूजन करून टोकाची भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींसाठी एक नवा आदर्श जनतेसमोर ठेवला आहे.
दिनांक १६ जानेवारी २०२२ रविवार रोजी आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील व मधुकर भाऊ काटे यांच्या उपस्थितीत राजुरी गावासाठी जिल्हापरिषदेच्या निधीतून शाळा खोली दुरुस्ती साडेआठ लाख (८,५०,०००) रुपये, नवीन शाळा खोली बांधकामासाठी साडेआठ लाख (८,५०,०००) रुपये, नवीन अंगणवाडी बांधकामासाठी साडेआठ लाख (८,५०,०००) रुपये, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती नवीन खोली व संडास, बाथरुम करीता चार लाख (४,००,०००) रुपये, दलित वस्ती अंतर्गत रस्त्यांसाठी पाच लाख (५,००,०००) रुपये तसेच दलित वस्तीत भूमिगत सांडपाण्याच्या गटारी करीता तीन लाख (३,००,०००) रुपये तसेच आमदार निधीतून राजुरी गावात छोटेखानी कार्यक्रम करता यावेत म्हणून पत्र्याचा सभामंडप म्हणजे (डोम) करीता सहा लाख रुपये व ग्रामस्थांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळाले पाहिजे म्हणून (Aqua filter) जलशुद्धीकरण युनिट करीता साडेचार लाख (४,५०,०००) रुपयांच्या निधी उपलब्ध करुन देत भुमीपुजन व उदघाटन सोहळा पार पडला.
यावेळी शाळा खोली, अंगणवाडी बांधकामाचे भुमीपुजन व उदघाटन सोहळा आमदार मा.श्री किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते, ग्रामपंचायत इमारतीचे भुमीपुजन राजुरी गावचे सरपंच मा.श्री. राहूल पाटील यांच्या हस्ते तसेच जलशुद्धीकरण प्लॅनचे व इतर विकास कामांचे उदघाटन व भुमीपुजन जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर भाऊ काटे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व असंख्य ग्रामस्थांच्या साक्षीने संपन्न झाले.
याप्रसंगी शिवदास तात्या माजी कृ.उ.बा.स.संचालक पाचोरा, नरुबापू माजी कृ.उ.बा.स.संचालक पाचोरा व उपसरपंच शिंदाड, रविभाऊ गीते पिंपळगाव हरेश्वर,नंदू पाटील वाडी सरपंच,डॉ. शेखर पाटील वाडी, डॉ. शिवाजी उभाळे भोजे, तसेच अनंतराव एकनाथ पाटील, सरपंच राहुल रामराव पाटील उपसरपंच सब्रु शेकलाल तडवी, सदस्य नामदेव श्रीराम पाटील, ज्ञानेश्वर यशंवत पाटील, शांताराम सुखदेव उभाळे, भागवत महादु पाटील नबाब कान्होबा तडवी, प्रेमचंद गोविदा पाटील, मुक्तार हमीद पटेल, मुरलीधर शहादु पाटील , प्रल्हाद गोंविदा पाटील परशुराम श्रीराम पाटील बालू गोविदा पा प्राथमिक शिक्षीका अरुणा उदांवते, नुतन चौधरी ज्ञानेश्वर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामसेवक संजय चौधरी यांनी केले.