वावडदा एल.एच.पाटील. इंग्लिश स्कूल मध्ये १५ वर्षा वरील विद्यार्थ्यांचे लसीकरण.

सुमीत पाटील.(वावडदा)
दिनांक~१२/०१/२०२२
जळगाव येथून जवळच असलेल्या वावडदा येथील एल.एच.पाटील. इंग्लिश मिडीय स्कूल मध्ये जळके आरोग्य उपकेंद्राअंतर्गत १५ वर्षा वरील ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण करण्यात आले. यावेळी या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासो एल.एच.पाटील. यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन तसेच रोशनी बारी व आदित्य पाटील या विद्यार्थ्यांना प्रथम लस देऊन लसीकरणाला सुरुवात केली सुरुवात करण्यात आली.
एल.एच.पाटील. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये १५ वर्षा वरील विद्यार्थ्यांना ६८ विद्यार्थ्यांना लसीकरण करुन घेण्यासाठी आरोग्य सेवक सलीम भाऊ पिंजारी, ए.सी.पाटील,श्रीमती सुनिता सपकाळे व आशा सेविका सरीता पाटील व जयश्री पाटील.व जळके आरोग्य उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी मुख्याध्यापक सौ.जयश्री पाटील यांच्या सोबत शाळेतील शिक्षक दिपक सराफ,स्वाती, योगेश चव्हाण व शाळेचे लिपिक महेंद्र पाटील,भरत पाटील तसेच संदिप पाटील, शाळेतील कर्मचारी लसीकरण केंद्रावर उपस्थित होते. लसीकरण यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिपाई प्रमोद मोरे,विजय पवार, संतोष वाघ,असलम मण्यार व रामचंद्र चव्हाण यांनी सहकार्य केले