सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

राजकीयशुभेच्छा जाहिरात
Home›राजकीय›ठाकरे सरकारच्या विरोधात पाचोऱ्यात भाजपाचे वीजबिल होळी आंदोलन

ठाकरे सरकारच्या विरोधात पाचोऱ्यात भाजपाचे वीजबिल होळी आंदोलन

By Satyajeet News
November 23, 2020
754
0
Share:
Post Views: 133
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
२३/११/२०२०
कोरोना (कोविड-१९) आजार संक्रमणाच्या प्रारंभीच्या काळातील वाढीव अवाजवी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा राज्यातील ठाकरे सरकारने केली होती.मात्र १७ नोव्हेंबर रोजी ऊर्जामंत्री मा.नितीन राऊत यांनी यावर पत्रकार परिषद घेऊन सवलत देता येणार नाही. नागरिकांना वीज बिल भरावीच लागतील असे सांगून,सक्तीने वीजबिल वसूल करण्याचे काम सुरु करुन जनतेचा विश्वासघात केला आहे. वाढीव व अवाजवी वीज बिलामुळे महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी,मजूर,व्यापारी,नोकरदार सर्व जनता त्रस्त असून शेतकरी बांधवांचा रब्बी हंगाम हंगाम सुरू असून शेती सिंचनासाठी व ग्रामीण भागात त्रासदायक ठरलेले वारंवार नादुरुस्त होणारे ट्रान्सफार्मर त्यासाठी लागणारे ऑईल व तत्सम साहित्याची असणारी कमतरता या समस्यांबाबत भारतीय जनता पार्टी तर्फे वीजबिल होळी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पुकारण्यात आले असून पाचोरा येथे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात छ.शिवाजी महाराज चौकात तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले यावेळी

*वाढीव वीजबिलाने जनता त्रस्त,*
*ठाकरे सरकार सत्तेच्या धुंदीत मस्त…*

*तिघाडी सरकारची बिघाडी जुबानी,*
*विजबिलाच्या धक्क्याने डोळ्यात पाणी…*

अश्या घोषणा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्या व सरकार चा निषेध केला.आंदोलनातील प्रमुख मागण्या-

१)शासनाने आर्थिक व दुर्बल घटकांतील ० ते १०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे ५ वर्षाचे वीजबिल माफ करू ही घोषणा पूर्ण करावी.

२)शासनाने सरासरी वीज बिलाची दुरुस्ती करून सोबत दिलेली उर्वरित वीज बिल भरण्याची सवलत द्यावी

३)शासनाने कोविड-१९ संचारबंदी काळातील मार्च,एप्रिल,मे व जून हे चार महिन्यांचे ० ते १०० व ० ते ३०० या वर्गातील वीज बिले माफ करावी.

४)शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा देण्यात यावा.

५)ग्रामीण भागात वारंवार नादुरुस्त होणारे ट्रान्सफार्मर 48 तासांच्या आत बदलून मिळावे तसेच त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे.

या प्रमुख मागण्यांचे निवेदन मा.प्रांताधिकारी पाचोरा व कार्यकारी अभियंता महावितरण पाचोरा यांना देण्यात आले या प्रसंगी उपस्थित भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी, तालुका सरचिटणीस संजय पाटील,शहर सरचिटणीस दीपक माने,राजेश संचिती,युवा मोर्चा शहराध्यक्ष समाधान मुळे,विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील,कुमार खेडकर, सोहन मोरे,ज्येष्ठ कार्यकर्ते गोरक्षबापू देवरे,किशोर संचेती,कांतीलाल जैन,भरतजीभु पा टील,रमेश शामनानी,विलास पाटील,देवराम लोणारी,अजय सोनार,जगन सोनवणे,एकनाथ महाजन,बंटी राठोड,अनिल परदेशी आदी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

देशात पुन्हा लॉकडाउन? पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी बोलावली ...

Next Article

किशोर पाटील कुंझरकर यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड. ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    शेंदुर्णीत शिवसेना शाखेचे उद्घाटन.

    August 7, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ रॅली कडे, निष्ठावंत शिवसैनिकांनी फिरवली पाठ.

    July 2, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    जळगाव शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऊध्दव भाऊ मराठे.

    January 4, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    भारत जोडो यात्रेत पाचोरा, भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते शेगावला जाणार.

    November 8, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत चाळीसगावात १६ रोजी विविध कार्यक्रम.

    November 14, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा मुघलशाही ठाकरे सरकारला मशाली पेटवून जागे करण्याची वेळ आली आहे -अमोल शिंदे.

    March 27, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    जो आव चैतन्याचा जिव्हाळा कोण दिवस येईल कैसा । नाही देहाचा भरोसा ।। आजीबाईंच्या अंत्ययात्रेत हे भक्तीगीत म्हणत असतांनाच समाधानवर काळाची झडप.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यातील लोहारी, वरखेडी व नगरदेवळा भागातून सुदृढ गायी, म्हशींची कत्तलखान्यात रवानगी.

  • महाराष्ट्र

    केंद्रशासनाने केलेल्या रासायनिक खते , पेट्रोल ,डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज