पाचोरा येथील श्री.गो.से. हायस्कूलचे शिक्षक-शिक्षीकांचा लसीकरण शोध मोहीमेत सहभाग.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१२/२०२१
पाचोरा नगरपालिका प्रशासनातील आरोग्य विभागाचे आदेशानुसार पाचोरा शहरातील नागरिकांना शंभर टक्के लसीकरण करुन घेण्यासाठी घरोघरी, गल्ली बोळात, कॉलनीत,जाऊन धडक मोहीम राबवत लसीकरण करत आहे. ही मोहीम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी लसीकरणा पासून वंचित असलेल्या नागरिकांची शोधमोहीम नगरपालिकेने हाती घेतली आहे. यात घरोघरी जाऊन नागरिकांची विचारपूस करून कोरोना लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे.
या शोधमोहीमेत प्रभाग क्रमांक एक मधील हनुमान वाडी, नागसेन नगर, थेपडे नगर, आशीर्वाद ड्रीम सिटी, रेणुका कॉलनी, मिलिंद नगर, प्रभाग क्रमांक एक मधील सर्व भाग व तेथील नागरिकांच्या कोरोना लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची माहिती घेऊन जनजागृती करण्यासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पाचोरा न.पा.सभागृहीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते नानासो. संजय वाघ, संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या आदेशानुसार पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कुल मधील सकाळ – दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी वरील परिसरातील घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस बाकी असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम शिक्षक-शिक्षीकावृंद करीत आहेत.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील सर उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघमॅडम पर्यवेक्षक एन. आर. पाटीलसर आर. एल. पाटील सर, ए. बी. अहिरे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक बंधू-भगिनी काम पाहत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये रहिवाशांमध्ये जनजागृतीचे काम सुरू असुन लवकरात लवकर हा प्रभाग शंभर टक्के लसीकरण होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.