पाचोऱ्यात शिवसेना (शिंदे गट) तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०३/२०२३
आज दिनांक १० मार्च २०२३ शुक्रवार रोजी पाचोरा येथे शिवसेना (शिंदे) गटातर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, ज्ञानेश्वर चौधरी, जिल्हा परिषद सदस्य पदमसींग पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, मा. नगरसेवक गंगाराम पाटील, बापू हाटकर, शितल सोमवंशी, सतीष चेडे, एकनाथ पाटील, सौरभ चेडे, विशाल पाटील, अनिल पाटील, विशाल राजपुत, रमेश पाटील, वैभव पाटील, सागर पाटील संतोष काजवे, संदिपराजे पाटील सह मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.