डॉ. सौ. ग्रीष्मा पाटील यांचे अचुक निदान व उपचारपद्धतीने लकीला मिळाला पुनर्जन्म.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०३/२०२३
सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील रहिवासी अजमल जयसिंग राठोड यांचा दोन वर्षे वयाचा लकी हा मुलगा मागील तब्बल दहा दिवसांपासून आजाराची लक्षणे दिसू लागताच लकीला जवळपासच्या दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान लकीची प्रकृती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस खालावत चालली होती. ही परिस्थिती पाहून व अजमल राठोड यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याकारणाने राठोड परिवारातील सगळेच चिंतीत झाले होते.
नेमके याच कालावधीत अजमल राठोड यांना पाचोरा येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. सौ. ग्रीष्मा पाटील यांच्याबद्दल माहिती मिळाली माहिती मिळताच अजमल राठोड यांनी क्षणाचाही विलंब न करता पाचोरा शहरातील सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये दाखल होताच डॉ. सौ. ग्रीष्मा पाटील यांनी फी किंवा इतर कोणत्याही बाबतीत विचारपूस न करता लगेचच बाळाच्या तपासण्या सुरु केल्या.
तपासणी अंती लकीच्या फुफ्फुसात कफ साचल्यामुळे झपाट्याने ऑक्सिजनची पातळी खालावत चालली होती. लकी बाळाची ही परिस्थिती पाहून लकीचे आईवडील हतबल झाले होते. कारण आर्थिक परिस्थिती बेताची पाचोरा शहरातील हा मोठा दवाखान्यात किती खर्च येईल याच चिंतेत राठोड कुटुंबीयांना ग्रासले होते. ही परिस्थिती पाहून व लकीच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर असलेली भिती लक्षात घेऊन डॉ. सौ. ग्रीष्मा पाटील यांनी त्यांना समजावून सांगत धीर देत लकीवर अचुक तपासणीतून लक्षणांची गंभीरता लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता योग्य उपचार सुरु केले.
दवाखान्यात लकीला दाखल करुन घेतल्यापासून डॉ. सौ. ग्रीष्मा पाटील त्याचे सहकारी आरोग्यसेवक, व सेविका यांनी मेहनत घेऊन सतत बारा दिवस रात्रंदिवस लक्ष देत वेळोवेळी योग्य औषधोपचार करुन लकीला मृत्यूच्या दाढेतून परत आणले लकी बारा दिवसांनंतर ठणठणीत झाल्यावर त्याला दवाखान्यातून सुट्टी देऊन घरी पाठवण्यात आले तेव्हा तो प्रसंग पाहण्यासारखा होता. याला कारणही तसेच होते.
“देव दिनाघरी धावला”
लकीला दवाखान्यात दाखल केल्यापासून एका बाजूला लकीवर दररोज औषधोपचार केले जात होते. जसजसे औषधोपचार केले जात होते तसतशी लकीच्या प्रकृतीत सुधारणा होत होती यामुळे लकीचे आईवडील आनंदीत होत होते मात्र दुसरीकडे दवाखान्यात किती खर्च येईल दवाखान्यातून जास्त बिल नाघले तर काय करायचे या चिंतेने त्यांना ग्रासले होते.
परंतु लकीच्या कुटुंबीयांनी मारक्रोफायनान्स बचत गटाच्या माध्यमातून हेल्थकेअर (मेडिक्लेम) विमा काढला होता. तसेच सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा असल्याने लकीच्या दवाखान्याचा संपूर्ण खर्च हेल्थकेअर या मारक्रोफायनान्स कंपनीच्या कॅशलेस सुविधेच्या माध्यमातून लाभ घेता आल्याने राठोड परिवाराला एक रुपयाही घरुन खर्च करावा लागला नाही. लकीला बाराव्या दिवशी दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली यावेळी लकीच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू व डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कारण लकीला दवाखान्यात दाखल करतांना डॉ. सौ. ग्रीष्मा पाटील यांनी हेल्थकेअर किंवा कोणताही विमा असल्याचे माहीत नसतांना कोणतीही अनामत रक्कम न मागता तातडीने उपचार सुरु केले व बारा दिवसाच्या उपचारादरम्यान कुठेही अडवणूक न करता अथक परिश्रम घेऊन लकीला एकप्रकारे पुनर्जन्म मिळवून दिला असल्याचे लकीचे आईवडील यांनी सांगितले.