सौ. वंदनाताई चौधरी यांच्या प्रयत्नातून, पाचोरा ते कळमसरा बस पुर्ववत सुरु.
दिलीप जैन.(कळमसरा)
दिनांक~२८/०९/२०२१
पाचोरा आगारातून कळमसरा गावासाठी पाचोरा, कळमसरा ते पाचोरा ही एसटी बस आधीपासूनच सुरु होती. मात्र कोरोनाच्या कालावधीत ही बससेवा बंद करण्यात आली होती. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरु झाले आहेत. तसेच कळमसरा हे मोठ्या लोकसंखेचे गाव असल्याकारणाने दैनंदिन कामानिमित्त तालुक्याचे कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने व पाचोरा ते कळमसरा एसटी बस सेवा बंद असल्यामुळे कळमसरा ग्रामस्थांना मोठी अडचण निर्माण झाली होती.
याची दखल घेत राष्ट्रवादी पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. वंदनाताई चौधरी व कळमसरा गावचे सरपंच मा. श्री. अशोक दादा चौधरी, ग्रामपंचायत सदस्य रमेश तेली यांनी पाचोरा एसटी आगाराच्या आधार प्रमुख सौ.निलीमाजी बागुल यांची भेट घेऊन पाचोरा ते कळमसरा एसटी बस सेवा सुरु करण्यासाठी विनंती केली.
त्या विनंतीचा विचार करत प्रवासी संख्या लक्षात घेत लगेचच पाचोरा ते कळमसरा बससेवा सुरु केली. जवळपास तब्बल एक वर्षानंतर पून्हा एसटी बससेवा सुरु झाली म्हणून पहिल्यांदाच एसटी गावात आल्यानंतर सौ.वंदनाताई चौधरी व मा.श्री. अशोक दादा चौधरी यांनी शाल, श्रीफळ व हार गुच्छ देऊन चालक संभाजी धनगर व वाहक सौ.सुरेखा वाघमोडे यांचा सत्कार केला व एसटी बसचे पुजन केले.
एसटी बससेवा पुर्ववत सुरु केल्यामुळे कळमसरा ग्रामस्थांनी पाचोरा आगाराच्या आगार प्रमुख सौ.निलमाजी बागुल यांचे आभार मानले.