हे अधिवेशन आहे की, गल्लीतल्या शेंबड्या पोरांची भांडणं. संतोष पाटील.

दिनांक~०२/०३/२०२३

हे अधिवेशन आहे की, गल्लीतल्या शेंबड्या पोरांची भांडणं. संतोष पाटील
—————————————-
मित्रहो असे किती अधिवेशन आलेत आणि गेलेत मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर विचार विनिमय होऊन किंवा चर्चा करून कुठलाच तोडगा निघाला नाही, किंवा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही, कापसासहित सर्वच शेती पिकांचे भाव सरकारने जाणून-बुजून पडलेत पिक विमा अवकाळी मदत या गोष्टीबद्दल अधिवेशनात चर्चा होतांना दिसत नाही आणि चर्चा झाल्यावरही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदारात काहीच पडत नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे,

“ही अधिवेशन आहेत की गल्लीतील शेंबड्या पोरांची भांडण हेच कळत नाही” जो, तो आपल्या पक्षाची बाजू सरस आम्हीच खरे, आहोत बाकी सगळे खोटे असं म्हणत वेळ मारून न्यायचा प्रयत्न करत आहेत. आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे, गोरगरीबांचे, वंचितांचे व सुशिक्षित बेरोजगारांचे अनेक असे प्रश्न आणि अडचणी ‘आ’ वासून उभे आहेत, या वीरांच्या सुरांच्या महाराष्ट्रामध्ये न्यायाच्या महाराष्ट्र मध्ये महापुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती यावी यावर विश्वास बसत नाही,

आपण कुठे चालत आहोत हेच कळत नाही. माझा राजा राजा श्री. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वर्गातून हे सारे पाहून नक्कीच दुःख होत असेल. रयतेचे राज्य स्थापन करून शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू न देणाऱ्या लोक कल्याणकारी राज्यात हे काय चाललंय, पक्ष वाढी शिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही. सत्तेसाठी आसुसलेले हे लोकं पाषाणी काळजाची झाली आहेत. संपूर्ण देशातील शेतकरी संकटात सापडला आहे. कुठल्याच शेतकऱ्यांविषयी गरिबा विषयाच्या कल्याणकारी योजना अमलात आल्या नाहीत.

दुसरी गोष्ट हे सरकार आपल वाटत नाही. खरं म्हणजे निवडणुकीच्या अजेंडा मधून शेतकरी गायब झाला त्याच दिवशी शेतकरी पूर्णपणे संपला, ज्यांनी किंवा त्यांच्या पक्षाने शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे केले. आज तेच गळा काढून म्हणत आहेत की हे कायदे रद्द करा, खरं म्हणजे सर्जकाच्या विरोधात काळे कायदे करण्याची गरजच काय जो भाकरीचं झाड लावून जगाचं पोट भरतो स्वतःच्या घामानं त्याची जमीन पिकवतो त्यांच्याच नशीबी अपराध्यासारख लाजीरवाण जिणं याव याहून दुसरं दुर्दैव काय असेल.

शेतकऱ्यांची पोर वैफल्यग्रस्त झाली आहेत या पोरांना सावरण्यासाठी एकत्रित आणण्याची गरज आहे, त्यांना या राजकीय पक्षांच्या विळख्यातून सोडवून बापाच्या मारेकऱ्यांचे झेंडे खांद्यावरून कसे फेकून देता येतील हे समजावून सांगून सगळ्यांना माईच्या पदराखाली एकत्र आणणं ही आता काळाची गरज झाली आहे, जोपर्यंत आम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, म्हणून आपण आता सर्वांनी गटतट विसरून एकत्र यायचे आहे.

मित्रहो फक्त एक वेळेस एकत्र या मग काय होतं ते पहा आपण एकत्र आलो नाही तर आपला नाश ठरलेलाच, एकत्र येण्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतील आणि एकत्र राहून शेतकरी ही जात निर्माण करून आपल्याला या देशांमध्ये सुखासमाधानानं जगता येईल.

संतोष पाटील.
७६६६४४७११२