शिवसेनेच्या उपनेत्या मा. सुषमा ताई अंधारे यांच्या जाहीर सभेला जळगाव पोलीसांकडून मज्जाव, ठाकरे सेनेकडून तिव्र निषेध.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२२

शिवसेनेच्या उपनेत्या मा. सुषमा ताई अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेनिमित्त मुक्ताईनगर येथे जाहीर सभा घेण्यात येणार होती व मुक्ताईनगर येथे जाहीर साभेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु जळगांव पोलीसांकडून ऐनवेळी सभेची परवानगी नाकारत आली व जळगाव पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मा. सुषमा ताई अंधारे यांना एका हॉटेलात स्थानबद्ध केले करुन सभेत उपस्थित रहाण्यासाठी मज्जाव केला या कारवाईमुळे तसेच शिवसेनेचे धडाडीचे तरुण, तडफदार शिवसैनिक कार्यकर्ते मा. श्री. शरद कोळी यांनासुद्धा सभेत सहभागी होऊ नये म्हणून भाषणावर बंदी घातली व जळगाव जिल्ह्यातून हुसकावून लावले या दोन घटनांमुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील ठाकरे समर्थक शिवसेना आक्रमक झाली असून शिंदे सरकारच्या दडपशाहीला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त करत आहे.

कारण शिवसेनेच्या उपनेत्या मा. सुषमा ताई अंधारे या शिवसेना पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर फिरुन ठिकठिकाणी सभा घेत आहेत. या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांच्या धरणगांव, पाचोरा, पारोळा, चोपडा या ठिकाणी सभा शांततेत पार पडल्या असतांना मात्र मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सभेसाठी जळगांव पोलीसांच्यावतीने ऐनवेळी त्यांच्या सभेची परवानगी नाकारण्यात येवून त्यांना जळगांव येथील एका हॉटेलात स्थानबध्द करण्यात आल्यामुळे जळगाव जिल्ह्यात व महाराष्ट्रातील तमाम ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी तिव्र नाराजी व्यक्त करत ठिकठिकाणी या दडपशाही व हुकुमशाही सरकारचा निषेध नोंदवला आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेच्या उपनेत्या मा. सुषमा ताई अंधारे ज्या हॉटेलात वास्तव्यास आणल्या होत्या त्या हॉटेललाच पोलीसांनी घेराव टाकला होता. त्या बाहेर पडल्यावर त्यांच्या गाडी भोवती ५०० च्या वर पोलीसांनी गराडा घातला होता म्हणून मा. सुषमा ताई अंधारे ह्या दशहतवादी होत्या का असा प्रश्न उपस्थित करुन जळगाव पोलीसांनी त्यांना दहशतवाद्याप्रमाणे वागणूक दिली असल्याचे आरोप करत हा प्रकार निंदनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व कायद्यानुसार सर्व नागरिकांना व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य बहाल केले असल्यावर ही व शिवसेनेच्या उपनेत्या मा. सुषमा ताई अंधारे ह्या संविधानाच्या म्हणजेच कायद्याच्या चौकटीत राहून महाप्रबोधन यात्रेनिमित्त सर्वसामान्य जनतेला संबंधित करत असतांनाच जळगाव पोलीसांनी हुकुमशाही पध्दतीने मुक्ताईनगर येथील होणाऱ्या जाहीर सभेवर बंदी घातली व शिवसेनेच्या उपनेत्या मा. सुषमा ताईंना एका हॉटेलात स्थानबद्ध केले हा प्रकार लोकशाहीला व भारतीय संस्कृतीला शोभणारा नाही अश्या प्रतिक्रिया ठाकरे सेनेतील महानगर शिवसेनेच्या वतीने ध कट्टर शिवसैनिकांनी व्यक्त केरत जाहीर निषेध व्यक्त करत आम्ही स्वातंत्र्याची होणारी गळचेपी कदापी सहन करणार नाहीत अशा आशयाचे निवेदन धुळे येथील मा. जिल्हाधिकारी यांना देऊन जाहीर निषेध नोंदवला आहे.

या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, मा.आ.प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, शहर संघटक राजेश पटवारी, देविदास लोणारी, विधानसभा संघटक ललित माळी, शहर समन्वयक भरत मोरे, कैलास पाटील, तुषार भामरे माजी महानगरप्रमुख चंद्रकांत गुरव, वानखेडे,संदीप सूर्यवंशी, अण्णा फुलपगारे, पुरुषोत्तम जाधव, विनोद जगताप, सुनिल भगवान पाटील, , जवाहर पाटील, रविंद्र काकङ,उपमहानगरप्रमुख मच्छिंद्र निकम, संजय जवराज, प्रविण साळवे, , हेमंत बागुल, महादू गवळी, प्रकाश शिंदे, कुणाल कानकाटे, छोटू माळी, सुनिल चौधरी, , मुन्ना पठाण, हिमांशू परदेशी, विभाग प्रमुख कैलास मराठे,, संजय पाटील, बाबुराव नेरकर, महेंद्र बागुल, राजु ढवळे, पिंटु चौधरी, अक्षय पाटील, रोहित धाकड, पिनू सूर्यवंशी, राजेश पाटील, मुरलीधर जाधव, शत्रुघ्न तावडे, अजय चौधरी, , दिपक मोरे, शुभम मतकर, कपिल लिंगायत, गुलाब धोबी, सागर हिरे,अनिल शिरसाठ, सुरेश चौधरी, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या