सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›शाॅपिंग कॉम्प्लेक्समधील ओट्यांच्या लिलावाचा फेर विचार करावा पाचोरा येथील भाजीपाला व फळविक्रेता असोसिएशनची मागणी.

शाॅपिंग कॉम्प्लेक्समधील ओट्यांच्या लिलावाचा फेर विचार करावा पाचोरा येथील भाजीपाला व फळविक्रेता असोसिएशनची मागणी.

By Satyajeet News
February 17, 2021
283
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/९२/२०२१

पाचोरा येथील नगरपरिषदेने दि. १८ फेब्रुवारी रोजी भाजीपाला मंडी व व्यापारी संकुलाच्या ओट्यांचा होणारा जाहिर लिलावाचा फेर विचार होऊन फक्त भाजीपाला व फळविक्रेते दुकानदारांपुरता मर्यादीत होणेसाठी येथील भाजीपाला व फळ विक्रेते असोशिएशनतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याने भाजी मंडईतील भाजीपाला ओट्यांच्या लिलाव प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पाचोरा शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुला शेजारी नविन विस्तारित व्यापारी संकुलातील नवीन गाळे जाहिर लिवाल प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजीपाला विक्रेत्यांसाठीच्या भाजी मंडईतील ओट्यांच्या जाहिर लिलाव व किंमतीबाबत व्यापारी बांधव व नगरपालीका सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात योग्य समन्वय न झाल्याने हा विषय चिघळला गेला होता.

त्यात दि. १८ फेब्रुवारीच्या जाहिर लिलावाबाबत असोशिएशनने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिल्याने ही प्रक्रिया अजुन जास्त चिघळली आहे. असोशिएशनने दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, आमचे आजोबा, वडीलांपासून गेल्या ५० ते ६० वर्षांपासून व्यापारी संकूलाच्या जागेवर भाजीपाला व फळविक्रीचा व्यवसाय करीत आहोत. नगर परिषद, पाचोरा यांनी या जागेवर नविन भाजी मंडी बांधकाम करणेसाठी आम्हाला दि.२२ सप्टेंबर २०१६ रोजी पत्र देऊन पाचोरा नगर परिषद मालकीचे आरक्षण क्रं. ३८ मध्ये भाजी मंडीचे बांधकाम करावयाचे असल्याने नमुद जागेत आपल्यासह सर्व किरकोळ भाजी विक्रेत्यांना स्थलांतरीत करणे गरजेचे आहे. करीता त्याकामी अध्यक्ष यांच्याशी चर्चा करण्याकरीता दि. २३ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्व भाजीपाला विक्रेत्यांना मिटींग मध्ये आश्वासन देण्यात आले होते की, आम्ही नवीन बांधकामासाठी जर जागा खाली करुन दिली तर नगर परिषद, पाचोरा आम्हाला कमी दरात व कमी किंमतीमध्ये दुकाने उपलब्ध करुन देईल. परंतु नगर परिषदेने तसे न करता त्या जागेवर तीन मजली व्यापारी संकुल बांधले आहे आणि सर्वात खालच्या तळमजल्यावर भाजीपाला मंडी करीता ओटे क्र.१ ते १४२ बांधले आहेत. ते सुध्दा ओपन लिलावाद्वारे कोणताही धंदा, व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांस गाळे घेण्याचा अधिकार असल्याचे आम्हाला कळाले आहे. असे झाल्यास आम्ही भाजीपाला फळविक्री करणाऱ्या छोटया व्यावसायिकांना पूर्वी दिलेल्या आशवासनाचा भंग होईल आणि जास्त पैसे देणाऱ्या इतर व्यावसायिकांकडून गाळे घेतले जातील. त्यामुळे आम्हा गरीब भाजीपाला फळविक्री तसेच नगरपरिषदेने भाजीमंडी ओटेची अनामत रक्कम ही जास्त ठेवली आहे. ती कमी करण्यात यावी कारण मागील वर्षापासून कोरोना संक्रमणाचा थैमान व

लॉकडाऊनमुळे आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून नगरपरिषदेने ठरविलेली अनामत रक्कम भरणे आम्हास शक्य होणार नाही. अनामत रक्कम कमी होऊन लिलाव न होता अनामत रक्कमेवरच ओटे आम्हा भाजीपाला व फळविक्रेत्यांना वितरीत करण्यास विनंती आहे. सदरील ओट्यांचा लिलाव न करता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या रेकॉर्डनुसार पिढीपंरपरेनुसार फक्त भाजीपाला व फळविक्री करणाऱ्या व्यावसायिकांच वरील गाळे व ओटे देण्यात यावे.

त्यासोबतच त्याठिकाणी भाजीपाला व फळविक्री व्यतिरिक्त अन्य इतर कोणताही व्यवसाय करता येणार नाही अशी सक्त ताकिद देण्यात यावी. भाजीपाला मार्केटच्या नियमाचा भंग होणार नाही याची काळजी घेण्यात यावी व परंपरागत भाजीपाला फळविक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशीही विनंती केली आहे. या निवेदनासोबतच दि.२२ सप्टेंबर २०१६ रोजीचे नगरपालिकेचे पत्र जोडले आहे. निवेदनाच्या प्रती आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.

निवेदनावर असोशिएशनचे अध्यक्ष सलिम शेख, उपाध्यक्ष भरत चौधरी, सचिव अकिल बागवान, सदस्य अकिल बागवान, जितेंद्र महाजन, रविंद्र भोई, माजिद बागवान, सुभाष वाणी, अश्पाक बागवान, शोएब बागवान, खलिल बागवान यांच्यासह २५ जणांनी सह्या केल्या आहे. उपविभागीय अधिकारी यांनी योग्य न्याय न दिल्यास असोशिएशन या जाहिर लिलावाला स्थगिती मिळण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारित आहे. भाजीपाला ओट्यांच्या जाहिर लिलावाबाबत भाजीपाला व फळ विक्रेते असोशिएशने घेतलेला पाविञा हा सत्ताधारी शिवसेनेसह आमदार किशोर पाटील यांच्या विकास गाड्याला अडथळा निर्माण करणारा आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 36
Previous Article

वडगाव कडे ग्रामपंचायत मध्ये मधुभाऊ काटे जि.प.सदस्य ...

Next Article

औरंगाबाद जिल्ह्यात गारपीट शेतकरी हवालदिल.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे अंधा बोले क्या होता, बहरा बोले ब्याह होता.

    March 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा निधन वार्ता अमोल विजय शिंदे याचे दुखःद निधन.

    September 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जिल्हाधिकाऱ्यांची यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट, राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला सखोल आढावा.

    November 27, 2025
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.श्री.कृष्णा भोये यांचे नागरीकांना अवाहन

    November 14, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वीरप्पनच्या पिल्लावळीला आलाय माज, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाताला खाज. दररोज शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल सुरुच.

    April 17, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेंदुर्णी नगरपंचायत तर्फे इंडियन स्वच्छता लीग ला सुरुवात.

    September 18, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान. पहान येथील अकील, शकील मागील तीन वर्षांपासून करत आहेत मोफत रुग्णसेवा.

  • राजकीय

    माळी समाजाचे ओबीसी नेते खडसे समर्थक अनिल महाजन राष्ट्रवादीत दाखल

  • महाराष्ट्रराष्ट्रीय

    संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज