कासमपुरा ग्रामपंचायतीवर भाजपा चा झेंडा. सरपंचपदी श्री. सतीष (गवळी)राजपूत तर उपसरपंचपदी सौ. शितल शिंदे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील कासमपुरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचे सतीष शामसिंग (गवळी)राजपूत यांची तर उपसरपंचपदी शितल दिपक शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुरस्कृत परिवर्तन जनसेवा पॅनेलने नऊ पैकी नऊ जागांवर विजय मिळवला होता.
आज दिनांक १३ रोजी झालेल्या सरपंचपदाच्या विशेष सभेत सतीष शामसिंग राजपूत यांची सरपंचपदी तर हटकर समाजाला २५ वर्षांनंतर संधी देत उपसरपंचपदी सौ.शितल दिपक शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी दारासिंग डोभाळ, गोकुळ महेर,शामा भिल,सकूबाई खरे,दिव्या राजपूत, प्रतिभा राजपूत, सुरेखा उघडे,हे सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जितेंद्र याज्ञिक यांनी काम पाहिले तर त्यांना तलाठी बी एम परदेशी, ग्रामसेवक नारायण सोनवणे यांनी सहाय्य केले.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच सतिष राजपूत व उपसरपंच सौ.शितल शिंदे यांचा सत्कार पॅनलप्रमुख राजू महेर,रायचंद मार्कंड,नितीन गवळी,संदिप (पिंटू) राजपूत,नकुल उघडे, बळीराम चोरमले,पदम डोभाळ, शामसिंग मोची,दिनकर कोळी यांसह असंख्य ग्रामस्थांनी केला.
नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे माजी मंत्री आ.गिरीष महाजन, भाजपचे नेते संजय शांताराम पाटील, पाचोरा पंचायत समितीच्या उपसभापती अनिता चौधरी, नमो फाउंडेशन प्रदेश सचिव डॉ.केयुर चौधरी, कैलास चौधरी, शरद सोनार आदींनी स्वागत केले आहे.