पुणे येथील भाजपा मधील माळी समाजाच्या कार्यकर्त्याची मानसिकता मेली का ? – अनिल महाजन, प्रदेशाध्यक्ष.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक :-२६/११/२०२०.
पाचोरा येथील श्री.अनिल महाजन.
प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र माळी समाज महासंघ.यांनी सत्यजीत न्यूजला संपर्क साधून त्यांनी एक पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पदवीधर मतदार संघातील उमेदवार संग्राम पाटील यांच्या प्रचारार्थ पुणे येथील महाबैठकीत विरोधी पक्ष नेते,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मनोगता मध्ये सुरुवातीला महापुरुषांचे नाव घेतांना क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे नाव त्यांनी घेतले नाही.
पुणे येथे मुलींनसाठी पहिली शाळा उघडून जोतिबा फुले यांनी अनमोल असे कार्य केले आहे.पुणे हा पुरोगामी विचारसरणीचा भाग आहे.महात्मा जोतिबा फुले यांना मानणारा वर्ग तेथे मोठ्या प्रमाणात आहे.माळी समाजासह बहुजन समाजाची संख्या पुणे येथे मोठ्या प्रमाणात आहे.या सर्व लोकांसह संपूर्ण महाराष्ट्रातील माळी / ओबीसी बहुजन समाजच्या भावना आपण आज दुखावल्या महात्मा जोतिबा फुले यांचे नाव का ? घेतले नाही आपण संविधानिक महत्वाचे पदावर आहेत.माजी मुख्यमंत्री आहात आपल्या कडून सर्व समाजाच्या लोकांच्या अपेक्षा आहेत.महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने आम्ही आपला आजच्या पुणे येथील कार्यक्रमाचा निषेध व्यक्त करतो.
*देवेंद्र भाऊ तुह्मी चुकले पुणे मध्ये कार्यक्रम घेतात आणि महात्मा जोतिबा फुले याचे नाव घेत नाहीत यांची आठवण आपल्याला कशी राहिली नाही फुलेंचा एवढा द्वेष का.?*
आपला .
श्री.अनिल महाजन.
प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र माळी समाज महासंघ.
इमेल आयडी- maha.malisamaj@gmail.com मोबाईल- ९९६७७१७१७१/ ८७८८९६४०५०