कुऱ्हाड खुर्द येथील अनिल चौधरी यांचे अपघती निधन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील अनिल विठ्ठल चौधरी हे आपल्या दुचाकीवरून जळगाव येथून घराकडे येत असतांनाच अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात होऊन या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
स्व. अनिल विठ्ठल चौधरी वय ३१ वर्षं हे कुऱ्हाड यांचे कुऱ्हाड येथे अनिल टेलर नावाने दुकान असुन ते टेलरचा व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह चालवत होते. तसेच ते चांगल्याप्रकारे व्यंगचित्रकार होते. मनमिळावू स्वभाव, सतत हसमुख, सुस्वभावी, व्यक्तीमत्व असल्याकारणाने सगळ्यांना हवाहवासा वाटणारा असा अनिल टेलर यांचे अपघाती निधन झाल्याने कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक व पंचक्रोशीतील गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही दुःखदायक घटना असून सर्व कुऱ्हाड ग्रामस्थ त्यांच्या परिवाराच्या दुःखात सामील आहे. परमेश्वर त्याच्या आत्म्यास चिरशांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली. अनिलच्या पश्चात पत्नी दोन वर्षाची मुलगी, आई, आजी व भावंडे असा मोठा परिवार आहे.