पाचोरा मतदार संघातील रस्ते दुरुस्तीसाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर-आ. किशोर आप्पा पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०१/२०२२
पाचोरा भडगाव विधानसभेअंतर्गत येणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामासाठी आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी दिली आहे. या सर्व रस्त्यांची मागणी स्थानिक जनतेने लावून धरली होती त्याची दखल घेत आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
मंजूर निधीतून होणाऱ्या रस्ते कामात पाचोरा तालुक्यातील सामनेर दहिगाव दरम्यान सुमारे साडेचार किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपये, सारोळा-मोंढाळा दरम्यान असलेल्या सुमारे चार किलो मीटर रस्त्यासाठी अडीच कोटी, चिंचखेडा गाळण दरम्यान असलेल्या सुमारे दोन किलोमीटर रस्त्यासाठी एक कोटी रुपये ,लासगाव बांबरुड दरम्यान चार किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये तर भडगाव तालुक्यातील आर्वी शिरूड-पळासखेडे -भडगाव दरम्यान सुमारे नऊ किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये भडगाव वलवाडी रस्ता सुधारणेकामी अडीच कोटी रुपये ,कजगाव -पारोळा रस्ता सुधारणा करणे अडीच कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
दरम्यान या कामांच्या मंजुरीबद्दल आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे,ना.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, सार्वजनीक बांधकाम मंत्री,ना.अशोक चव्हाण,पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
(प्रतिक्रिया)
रस्ते सुरक्षितता हा जीवन, मरणाचा प्रश्न आहे म्हणून रस्ते दुरुस्ती कामासाठी आपले कायमच प्राधान्य राहिले असुन मतदारसंघातील इतर नवीन व दुरुस्ती करावयाच्या रस्त्यांच्या कामासाठी देखील आपला सतत पाठपुरावा सुरूच आहे.
आ.किशोर आप्पा पाटील
आमदार पाचोरा- भडगाव.