दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२३

घटस्फोट झाल्याचा राग येऊन जावयाने मावस सासऱ्याला तु मला जिथे सापडशिल तेथे मी तुला मारुन टाकेल अशी धमकी भ्रमणध्वनीद्वारे दिल्याची घटना पाचोरा तालुक्यातील कोकडी तांडा येथे घडली असून या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला धमकी देणाराच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की वरसाडे तांडा येथील रहिवासी लुकडुदास महारु राठोड वय वर्षे (४२) हे दिनांक १९ डिसेंबर २०२३ मंगळवार रोजी पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथुन जवळच असलेल्या कोकडी तांडा येथे नातलगांना भेटण्यासाठी आले होते. नेमके याच दिवशी जामनेर तालुक्यातील लिहे तांडा येथील रहिवासी अंकुश मदन चव्हाण याने स्वताच्या ७४९९२१६८४३ या भ्रमणध्वनी क्रमांकावरुन फिर्यादीच्या ७४९९२१६८४३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर १९ डिसेंबर मंगळवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोबाईलवरून फोन करुन अश्लील शिवीगाळ करत तु मला जिथे दिसशील तेथे मी तुला मारुन टाकेल अशी धमकी दिल्या कारणाने लुकडुदास राठोड यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली असून संबंधित धमकी देणाऱ्या अंकुश चव्हाण याचे विरोधात भारतीय दंड संहिता १८६० कलम ५०७ नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता वरसाडे तांडा येथील फिर्यादी लुकडुदास महारु राठोड यांची वडगाव आंबे येथील रहिवासी पुतणी व आरोपी अंकुश चव्हाण हे दोघ पतीपत्नी असून यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. परंतु लुकडुदास राठोड यांच्या पुतणीचा अंकुश चव्हाण हा कोणत्या ना कोणत्या कारणाने दारु पिऊन सतत मानसिक व शारीरिक छळ करत होता. या छळाला कंटाळून लुकडुदास राठोड यांच्या पुतणीने नांदण्यासाठी नकार दिल्याने या दोघांचा दोन महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला आहे. या घटस्फोटासाठी लुकडुदास राठोड हाच कारणीभूत असल्याचा राग मनात ठेवून अंकुश चव्हाण याने मावस सासऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली असून पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदिप गोरबंजारा करत आहेत.