पिंपळगाव (हरेश्वर) येथे ४२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०६/२०२३
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील एका ४२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने धाकटेगाव शिवारातील शेतात झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना दिनांक २० जुन २०२३ मंगळवार रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील अल्पभूधारक शेतकरी योगेश भास्कर वाघे (वय, ४२) हे शेती करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. दिनांक २० जुन २०२३ मंगळवार रोजी नेहमीप्रमाणे शेताचे काम करण्यासाठी ते शेतात गेले होते. दरम्यान सायंकाळी चार वाजेच्या सुमारास धाकटेगाव शिवारातील शेत गट क्रं. १२२४ मधील झाडाला योगेश वाघे यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह ग्रामस्थांना आढळुन आला होता.
ग्रामस्थांच्या मदतीने योगेश वाघे यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी योगेश वाघे यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरच्या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला शुन्य क्रमांकाने नोंद करुन पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली आहे. मयत योगेश वाघे यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. अतिशय मेहनती व शांत स्वभावाचे योगेश वाघे यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून सततची नापीक, कापसाला योग्य भाव नसल्यामुळे या शेतकऱ्यांने आत्महत्या केली असून याच्शाया कुंटुबीयांना सनामार्फत त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी पिंपळगाव हरेश्वर परिसरातील जनतेतून केली जात आहे.