शिंदाड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांना सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी भरवला पेढा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०३/२०२३

पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सामाजिक व राजकीय मतभेद विसरुन गावात शांतता व एकोपा टिकून राहण्यासाठी गावातील जेष्ठ, श्रेष्ठ राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन योग्य मार्गदर्शनाखाली गाव विकासासाठी सतत झटणारे व सामाजिक बांधिलकी व एकोपा टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या होतकरु तरुण, तडफदार उमेदवारांची निवड करत सन २०२३ ते २०२७ या वर्षांकरिता १३ पैकी १३ संचालकांची आज नुकतीच बिनविरोध निवड करुन निवड झाल्यानंतर प्रथम आराध्यदैवत श्री. गणपतीबाप्पांचे दर्शन घेतले. या बिनविरोध झालेल्या निवडणुकीमुळे शिंदाड गावाने संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे.

शिंदाड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या बिनविरोध निवडणुकीत
सर्वसाधारण जागेसाठी हिलाल रामदास पाटील, समाधान सिताराम पाटील, नरेंद्र विक्रम पाटील, प्रेमसिंग भुरा परदेशी, अर्जुन नारायण पाटील. भाऊसाहेब नारायण पाटील, रमेश काशीराम पाटील, दिलीप भाऊराव तांबे, महिला राखीव जागेसाठी लताबाई धोंडु चौधरी, सुरेखा श्रिकांत पाटील, इतर मागास वर्गासाठी संजय बळीराम पाटील, विमुक्त भटक्या जमातीसाठी धनगर कृष्णा अर्जुन, अनुसूचित जाती जमाती साठी दत्तात्रय रामदास पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

ही बिनविरोध निवडणूक पार पडताच पाचोरा तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या आदरणीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी व जळगाव जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख मा. श्री. उध्दव भाऊ मराठे यांनी दिनांक ११ मार्च २०२३ शनिवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता शिंदाड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात जाऊन बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकाचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन अभिनंदन केले. तसेच ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी शिंदाड गावातील ज्या, ज्या जेष्ठ, श्रेष्ठ, नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचाही सत्कार करत त्यांचेही अभिनंदन केले.

तसेच या बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांना शुभेच्छा देण्यासाठी घेण्यात आलेल्या आनंदमय सत्कार समारंभ प्रसंगी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख व कायदेतज्ज्ञ मा. श्री. अभय दादा पाटील, सचिव मा. श्री. प्रशांत जैन, विकास बापू, आनंदा चौधरी, हरी अमृत चौधरी अशोक पंडित लोधी, अरुण तांबे, भास्कर रामचंद्र पाटील, विजय सदाशिव पाटील, सुरेश अर्जून पाटील, शांताराम बळीराम पाटील, धोंडू संपत पाटील सोसायटीचे सर्व सभासद व शिंदाड गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.