वडगाव आंबे खुर्द व बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनल बाजी मारणार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/११/२०२३

वडगाव आंबे खुर्द व बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सन २०२३ च्या पंचवार्षिक निवडणुकीत अरुण भाऊ पवार हे ग्रामविकास पॅनल व वसंत भाऊ पवार व विनोद राठोड हे परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरले होते. काल दिनांक ०५ नोव्हेंबर २०२३ रविवार रोजी नुकतेच मतदान घेण्यात आले. यात वॉर्ड क्रमांक एक मध्ये ३७७, वार्ड क्रमांक दोन मध्ये ४२० व वार्ड क्रमांक तीन मध्ये ३९९ मत दात्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यातून सरपंच पदासह ग्रामविकास पॅनलच्या सर्वच्या सर्व दहा पैकी दहा जागा बहुमताने विजयी होतील अशी चिन्हे दिसत आहेत.

“सविस्तर वृत्त दुपारी एक वाजता तोपर्यंत बघत रहा सत्यजित न्यूज”

*महत्वाचे*
(मतदान केंद्रावर एका तरुणाने धुमाकूळ घातला होता या तरुणाला पोलीसांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता संबंधित तरुणाने पोलिसांसोबत हुज्जत घालत हमरीतुमरीवर येत शुध्द दादागिरीची भाषा वापरत अरेरावी केली होती. मात्र संबंधित तरुणावर अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नसल्याने आज निवडणूक निकाल लागल्यानंतर संबंधित तरुण अजूनही धुमाकूळ घालू शकतो अशी दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळत असल्याने संबंधित तरुणावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.)

ब्रेकिंग बातम्या