थकीत भाडे वसुलीसाठी दत्त माध्यमिक विद्यालयाला लोहारी ग्रामपंचायतीतर्फे नोटीस जारी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०८/०२०२३
पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथे सन १९९२ साली नवल भाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून दत्त माध्यमिक विद्यालय ही शैक्षणिक संस्था सुरु करण्यात आली होती. या माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग नियमित व चांगल्याप्रकारे सुरु होते. परंतु काही कारणास्तव ही संस्था नवल भाऊ प्रतिष्ठानतर्फे विकण्यात आली असून हे दत्त माध्यमिक विद्यालय बिस्मिल्लाह मल्टिपर्पज फॉउंडेशन चे अध्यक्ष सय्यद बागवान यांनी घेतली आहे. परंतु या शैक्षणिक संस्थेची विक्री करतांना मात्र शाळेची इमारत व स्थावर मालमत्ता नवल भाऊ प्रतिष्ठान यांनी विक्री केली नसल्याने दत्त माध्यमिक विद्यालय सुरु करण्यासाठी सय्यद बागवान यांना इमारत पाहिजे होती.
संस्था विक्री झाल्याची बाब लोहारी ग्रामस्थांना माहीत झाल्यावर लोहारी गावातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या परंतु संस्था ही खाजगी असल्याकारणाने लोहारी ग्रामस्थांजवळ काही पर्याय नव्हता परंतु आता ऐनवेळी जर दत्त माध्यमिक विद्यालयातील मुलांना शाळा भरवण्यासाठी जागा उपलब्ध झाली नाही तर लोहारी येथील इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल ही बाब लक्षात घेऊन लोहारी बुद्रुक येथील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हापरिषदेच्या मराठी मुलांच्या रिकाम्या असलेल्या शाळा खोल्या दत्त माध्यमिक विद्यालयाला भाडेतत्त्वावर देण्यासाठी २५ जानेवारी २०२० ला एक ठराव करुन जिल्हापरिषदेकडून मान्यता मिळवून घेत दत्त माध्यमिक विद्यालयाला भाडेतत्त्वावर दिल्या आहेत.
परंतु संस्थाचालक सय्यद बागवान यांनी लोहारी गावच्या ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत सन २०२० पासुन ते आजपावेतो म्हणजे सन २०२३ पर्यंत शाळेने ठरवून दिलेले भाडे लोहारी ग्रामपंचायतीला दिलेले नसल्याने सरतेशेवटी भाडे वसुलीसाठी लोहारी ग्रामपंचायतीने दत्त माध्यमिक विद्यालयाचे संस्था चालक सय्यद बागवान यांना नोटीस बजावून भाडे त्वरित अदा करावे अन्यथा शाळा खोल्या त्वरित रिकाम्या करुन ताबा सोडावा अशी नोटीस बजावली आहे.
(पुढील भागात “दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्थाचालकाची मनमानी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर फिरतेय पाणी” या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त वाचा सत्यजित न्यूजला)