केंद व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे धरणे आंदोलन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०२/२०२३
केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली युवासेना, शेतकरी सेना, महिला आघाडी, व्यापारी आघाडी, अल्पसंख्याक आघाडी व शिवसैनिक व पाचोरा, भडगाव तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत आज दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजल्यापासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत शेकडो शिवसैनिकांनी पाचोरा येथील शिवतीर्थ शिवसेना कार्यालयापासून हातात निषेधाचे व विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयासमोर मंडपात एकदिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी घोषणाबाजीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक व तहसील कार्यालयासमोरील परिसर दणाणून गेला होता.
या एकदिवसीय धरणे आंदोलनाचा मुळ उद्देश म्हणजे सोयाबीन, तुर, सुर्यफुल पिकाला प्रति क्विंटल आठ हजार रुपये भाव मिळावा, पिक विमा योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, तसेच पाचोरा, भडगाव तालुक्यात सततच्या पावसामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी, शेतीसाठी दिवसा पूर्ण दाबाने सतत आठ तास विद्युतपुरवठा मिळावा, मागील काळातील विज बिलाची संपूर्ण थकबाकी माफ करावी, पाचोरा, भडगाव तालुक्यात पोकरा योजना लागू करावी, शेतकन्यांना शेतीकर्ज घेण्यासाठीची सिबिल स्कोरची अट रद्द करण्यात यावी, से. बी. च्या मार्फत शेतमालाची वायदे बाजारावर केलेली बंदी ताबडतोब उठवण्यात यावी, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, प्रोत्साहनपर अनुदान पात्र शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मिळवून देण्यासाठी मागील सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, जंगली प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे म्हणून या नुकसानी पोटी नुकसान भरपाई मिळावी, जंगली प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर सौर कुंपण योजना अंमलात आणावी, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ती नुकसान भरपाई त्वरित मिळावी, मुख्यमंत्री सौर योजना व पंतप्रधान कुसूम सोलर योजनेची व्याप्ती वाढवून मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मोफत सोलर पंप योजनेचा लाभ द्यावा, रोजगार हमी योजने अंतर्गत केळी पिकासाठी मिळणारी अनुदानाची रकम तीन वर्षा ऐवजी दोन वर्षात मिळावी या मागण्या करण्यात आल्या.
सकाळी दहा वाजल्यापासून धरणे आंदोलनाच्या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सह सौ. वैशालीताई सुर्यवंशी, शेतातील सेनेचे तालुकाप्रमुख मा. श्री. रमेशचंद्रजी बाफणा यांनी पेरणी केल्यापासून तर शेतमाल घरात येईपर्यंत शेतकऱ्यांनी केलेला खर्च व मेहनत याचा लेखाजोखा मांडला व आता केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी विरोधी निर्णय घेतल्याने शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणार नसल्याचे सांगत शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे तरच शेतकरी जगेल नाहीतर डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना मुलामुलींचे शिक्षण, विवाह, घरखर्च, दवाखाना खर्च व इतर दैनंदिन खर्च करणे शक्य होणार नाही व दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढतील अशी भीती व्यक्त केली व प्रांताधिकारी मा. श्री. विक्रमजी बांदल साहेब यांना कापूस भरलेली टोपली, हरभरा व मका भरलेल्या थैल्या देऊन आमच्या मागण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करावा अशी विनंती केली.
या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपक भाऊ राजपूत, मनोहर चौधरी, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, पाचोरा तालुकाप्रमुख शरद पाटील,भडगाव तालुका प्रमुख शंकर मारवाडी, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, शहरप्रमुख दिपक पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी संदीप जैन, राजेंद्र राणा, जितेंद्र जैन, महिला आघाडीच्या तिलोत्तमा मोर्य, मंदाकिनी पारोचे जयश्री येवले अनिता पाटील, माजी नगरसेवक दादाभाऊ चौधरी व शहर समन्वयक बंडु मोरे, युवासेना तालुकाप्रमुख भुपेश सोमवंशी , युवासेना शहरप्रमुख हरीश देवरे, जे के पाटील,गोरख पाटील, शाम महाजन, प्रशांत सोनार, गौरव पाटील, संजय चौधरी, जगदिश महाजन, जितेंद्र जैन, पप्पू जाधव, फ़ईम शेख़, अजय पाटील, महेंद्रसिंग पाटील, कैलास पाटिल, कृष्णा पाटील,अभिषेक खंडेलवाल, आनंद जैन, खंडू सोनवाने, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, सुनील पाटील, महेश पाटील, समाधान पाटील, मनोहर पाटील, प्रतीक पाटील, हिमांशु पाटील, ओम पाटील, अकबर आली, संजय चव्हाण आदी पदाधिकारी सह कार्यकर्ते, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.