शिंदाड परिसरात अलिबाबा व चाळीस चोरांची टोळी सक्रिय, कापूस चोरट्यांना अटक व कारागृहात रवानगी झाल्याने अनेक गुन्ह्यांचा तपास गुलदस्त्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२३

पाचोरा तालुक्यातील गावागावातून शेतीमालासह घरफोडी व इतर प्रकारच्या भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरुच असून पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड गावात पाच शेतकऱ्यांच्या प्लॉट, पत्र्याच्या शेडमध्ये व घरात ठेवलेल्या कापूस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल केली असून दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी पिंपळगांव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३१/२०२३ भादवि कलम ४६१ ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील व पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशन हद्दीतील शिंदाड गावात दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी सायंकाळी सहा पासून तर दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार पर्यंतच्या कालावधीत गावठाण परिसरात गव्हले रस्त्यावरील प्लॉट, गोडाऊन तसेच शेतमाल भरलेल्या खोलीत भरलेल्या कापूस अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून, धाब्याची पत्रे वाकवून चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

यात कापूस चोरीच्या घटनेत नितीन परमेश्वर पाटील यांच्या मालकीचा २,७२,००० रुपये किंमतीच्या कापसापैकी अंदाजे ४००००/०० किंमतीचा ०५ क्विंटल, उत्तमराव बालचंद परदेशी यांच्या मालकीचा अंदाजे १,२०,००० किंमतीचा १५ क्विंटल, शालिक आनंदा पाटील यांच्या मालकीचा अंदाजे ४०,००० रुपये किंमतीचा ०८ क्विंटल, अशोक गिरधर चौधरी यांच्या मालकीचा अंदाजे १६,०००/०० रुपये किंमतीचा ०२ क्विंटल, हरी अमृत चौधरी यांच्या मालकीचा अंदाजे ५६,०००/०० रुपये किंमतीचा ०७ क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत कापूस उत्पादक शेतकरी, साक्षीदार नितीन परमेश्वर पाटील, उत्तमराव बालचंद परदेशी, शालिक आनंदा पाटील, अशोक गिरधर चौधरी व हरी अमृत चौधरी यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. श्री. एम. राजकुमार साहेब, चाळीसगाव परिमंडळचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. रमेश चोपडे साहेब, पोलीस उपविभागीय अधिकारी भाग पाचोराचे मा. श्री. अभयसिंग देशमुख साहेब, पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार, सहाय्यक फौजदार मा. श्री. रामकृष्ण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल श्री. जितेंद्र पाटील, श्री. मुकेश लोकरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री. रणजित पाटील पोलिस नाईक श्री. शिवनारायण देशमुख, पोलिस नाईक श्री. अरुण राजपूत, श्री. दिपकसिंग पाटील, श्री. अभिजित निकम, श्री. प्रशांत पाटील, अमोल पाटील, संदिप राजपूत, यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन संशयीत आरोपी समीर जलाल तडवी, वय- १९ वर्षे, शकील मुश्ताक तडवी, वय २२ वर्षे, अफसर दगडु तडवी, वय १९ वर्षे, ईमान सलीम तडवी, वय २६ वर्षे, शकील बिस्मिल्ला तडवी, वय ३१ वर्षे, विनोद कचरु तडवी वय ३६ वर्षे, रहीम मुश्ताक तडवी, वय २३ वर्षे, अनिल दिलावर तडवी, वय- २५ वर्षे, अस्लम हुसैन तडवी, वय २१ वर्षे, सर्व रा. शिंदाड, ता. पाचोरा यांचा लागलीच शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन गुन्ह्यांच्या तपासासाठी अटक केली होती परंतु सर्वच्या, सर्व संशयित आरोपींना पोलिस कस्टडी न मिळाल्याने तपासात व्यत्यय आला आहे.

(नऊ चोरांना अटक परंतु अलिबाबा मोकाटच)
—————————————
अटकेतील सर्व आरोपींना दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ शनिवार रोजी पाचोरा न्यायालयात हजर करत अधिक तपास कामी पोलीस कस्टडीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने सर्वच्या सर्व आरोपींना पोलिस कस्टडी न देता (मॅजेस्टेड कस्टडी) सुनावल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना जर पोलिस कस्टडी मिळाली असती तर सखोल चौकशी करता आली असती व आजपर्यंत घडलेले अनेक गुन्हे तसेच या कापूस चोरट्यांनी चोरुन नेलेल्या कापसाची खरेदी करणारे दोन कापूस व्यापारी कोण हे उघडकीस आले असते असे मत पिंपळगाव हरेश्र्वर तसेच पंचक्रोशीतील गावागावांतील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त करत (चोरट्यांना अटक परंतु अलिबाबा मोकाटच) असल्याने त्यांना अटक करुन या गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या