शेतकरी संघटनेचे “चोसाका” वर ठिय्या आंदोलन, उसाला २५०० भाव मिळावा या मागणीवर आंदोलक ठाम.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/११/२०२२

चोपडा तालुक्यातील चोपडा सहकारी साखर कारखाना हा बारामती अॕग्रोने भाडेतत्वावर चालविण्यास घेतला आहे. यंदा गळीत हंगाम सुरु होवून जवळपास वीस दिवस लोटून गेले मात्र तरीसुद्धा उसाचा दर निश्चित न केल्यामुळे व उसाला पहिली उचल २५०० मिळावी या मागणीकरीता शेतकरी संघटनेतर्फे आज दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ गुरुवार रोजी ठिक अकरा वाजता कारखान्याच्या साईटवरील वजनकाट्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येत शेतकरी बांधव व महिलांची उपस्थिती होती.


यावेळी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदिप पाटील, जिल्हाध्यक्ष संजय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, तालुकाध्यक्ष (चोपडा) सचिन शिंपी, अखिलेश पाटील तालुका अध्यक्ष (भडगांव), सचिन डाभे, भरत पाटील, कुलदिप पाटील, देवेंद्र पाटील, महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील, अजित पाटील, चेतन पवार, राहुल पाटील, विनोद पाटील, प्रेमचंद धनगर, विनोद धनगर, विजय पाटील, श्याम पाटील, संग्रामसिंग राजपूत, राहुल पाटील, सुरेश पाटील* आदिंसह इतर शेतकरी बांधव व महिलांची उपस्थिती होती.

ब्रेकिंग बातम्या