कुऱ्हाड, सार्वे परिसरात विद्यूत वितरण कंपनीकडून शेतकर्यांचा विद्युत पुरवठा खंडित, दुसरीकडे विद्युत चोरांची मात्र चंगळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०३/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड व सार्वे परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांचा विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीने पूर्वसूचना न देता खंडित केल्यामुळे शेवटच्या टप्प्यात आलेली रब्बीची पीके शेतकऱ्यांच्या हातचे जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
अचानकपणे विद्यूतपूरवठा खंडीत केल्यावर वैतागलेल्या शेतकऱ्यांचे पावलं हाऊसवर ठिय्या आंदोलन.
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड व सार्वे हा परिसर कनिष्ठ अभियंता वरखेड यांचे कार्यकक्षेत येतो. आज वरखाडी येथील कनिष्ठ अभियंता यांनी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता थकित बिलापोटी खंडित केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी मागील महिन्यात काही प्रमाणात विज बिल भरलेले आहेत. तसे आता हंगाम हाती आल्यानंतर शेतमाल विकून उर्वरित विज बिल भरणा करणार आहेत.
https://youtube.com/shorts/o8R81CbAaLw?feature=share
अगोदर विद्यूतपूरवठा खंडीत नंतर दवंडी देऊन सुचना.
परंतु पिके परिपक्व होऊन थोड्याच दिवसात पिके काढणीला सुरुवात झाली असती. परंतु रब्बी पिके जोमाने वाढत असतांनाच ऐन शेवटच्या टप्प्यात विद्यूत वितरण कंपनी कडून कोणत्याही पुर्व सुचना न देता विद्यूतपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
एकाबाजूला अधिकृत विद्युत ग्राहक बिले भरण्यास तयार आहेत. तयारी विद्यूतपुरवठा खंडित केला जातो व दुसरीकडे मात्र काही शेतकरी विद्युत वाहिनीवर आकोडे टाकून वीज चोरी करत आहे. तसेच गावागावात घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात विद्यूत चोरी सुरु आहे. त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने विद्युत ग्राहकांना मंगळ व विद्युत ग्राहकांची चंगळ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसेच विद्युत चोरीकडे दुर्लक्ष करण्यामागचे कारण म्हणजे यातून विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांना हप्ते मिळुन मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याचे जनमानसातून ऐकायला मिळत आहे.
हंगाम हातचा जाऊनये म्हणून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करुनये अशी मागणी होते आहे.