देवेंद्रजी तुमची भुक खूप मोठी असली तरी,सत्तेचा पदांचा इतका हव्यास बरा नव्हे.

देवेंद्रजी तुमची भुक खूप मोठी असली तरी,सत्तेचा पदांचा इतका हव्यास बरा नव्हे.
संतोष पाटील
दिनांक~२५/०९/२०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माननीय माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहात भाजपाचे महत्त्वाचे नेते आहात, त्यात आपणास बऱ्याच जिल्ह्यांची पालकमंत्री पदाची (Guardian minister)जबाबदारी मिळाली आहे (की मिळवून घेतली) खरं म्हणजे एक प्रश्न असा पडतोय पक्षाची उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडताना खूपच दमछाक होते त्यात हे इतक्या जिल्ह्यांचे पालकत्व स्वीकारणं म्हणजे खूपच अवघड, आपण आपल्या मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना पाच वर्षांमध्ये बऱ्यापैकी भरघोस मदत देऊ ,त्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं बोललात मात्र आपण आत्मपरीक्षण करावं त्यातलं काही झालं का? त्यानंतर आपली सत्ता गेली आपण विरोधी बाकावर बसलात विरोधी बाकावरून आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल, महाराष्ट्रातल्या बेरोजगारी बद्दल ,स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दल, शिक्षणाबद्दल,आरोग्याबद्दल, काही बोललात का आवाज उठवलात का नाही ना? बरे असो थोड्या दिवसात (गद्दारीच्या मार्गाने का होईना )आपली सत्ता आली आपण या राज्याचे उपमुख्यमंत्री झालात त्याच्यानंतर राज्यामध्ये इतिहासाने नोंद कराव्या अशा घटना झाल्या राज्याच्या प्रतिमेला कुठेतरी काळिंबा फासला गेला, विकासावर रचनात्मक कार्यावर आपण फक्त बोललात बोलतात काम करत नाही हे आपणास मान्य करावे लागेल, जितका वेळ आपण पक्ष बांधणीच्या कामासाठी देतात त्याच्यात काही वेळ जर महाराष्ट्रासाठी दिला असता तर नक्कीच विकास झाला असता, आता थोड्या दिवसापूर्वी महाराष्ट्रातील काही महत्त्वकांक्षी ,महाकाय ,कितीतरी बेरोजगारांना काम मिळेल अशे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले आपण बघ्याची भूमिका घेतली त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय तर या प्रकल्पांपेक्षा मोठे प्रकल्प आणू महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊ हे शक्य आहे का? साहेब आपण जे बोलतो त्यातलं किमान ५० टक्के तरी खरं असावं किंवा करता आलं पाहिजे तर त्या बोलण्याला विधानाला महत्त्व प्राप्त होतं , साहेब मी एक ग्रामीण भागामध्ये राहणारा अल्पशिक्षित शेतकरी पुत्र स्वतः शेती करत असताना शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांचे प्रश्न अनुभवतोय जगतोय आपण राजकीय लोक ज्या गोष्टींना शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणून भवनांमध्ये मांडतात ते शेतकऱ्यांचे खरे प्रश्न नाहीत, मुळात दुर्दैवाने या महाराष्ट्रातील देशातील लोकांना शेती व शेतकरी कळलाच नाही फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भावनिक बोलायचं त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करायचा इतकंच इथे चाललेल आहे,आपल्या दोन हाताकडून आपल्या मेंदूची शरीराची क्षमता पाहून आपण काम करतो खरं म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळन फार आवड आहे करायला बसलो तर फार मोठं काम करता येईल, त्यात आपण अनेक जिल्ह्यांची पालकमंत्र्यांची जबाबदारी स्वीकारली आहे, एका जिल्ह्याचं पालकत्व पूर्ण करताना खूप अडचणी येतात खूप काम असतात जिल्हा प्रशासन व राज्य सरकार यांच्यामधील दुवा बनून जिल्ह्यातील अनेक कमिट्यांचं ,नियोजन समितीचे व विकासाचे काम पाहावं लागतं, आपण आपल्या पाल्याची जशी जबाबदारी घेतो तशीच जिल्ह्याची जबाबदारी घेऊन काम करावं लागतं हे आपणास सांगणे न लागे खरंच इतका मोठा व्याप आपण सांभाळून काम करू शकत असाल तर निश्चितच आनंदाची गोष्ट आहे, मात्र जमत नसेल तर अट्टहास करून या महाराष्ट्रातील जनतेसह आपण स्वीकारलेल्या जिल्ह्यातील जनतेचं वाटोळ करू नका.
. संतोष पाटील
7666447112

ब्रेकिंग बातम्या