जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या शेरी पाझर तलावात शेतकऱ्याने केला मातीचा भराव, अरुण पवार यांची तक्रार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे बुद्रुक शिवारातील जिल्हापरिषद जळगाव सिंचन विभागामार्फत पाझर तलाव बांधण्यात आला असून हा पाझर तलाव शेरी पाझर तलाव या नावाने ओळखला जोतो. या तलावाच्या जलसाठ्यावर वडगाव आंबे बुद्रुक, वडगाव आंबे खुर्द या दोन बंजारा वस्तीच्या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तसेच याच पाझर तलावात पावसाळा, हिवाळा व उन्हाळ्यात कोल्हे, पिंप्रि, डांभुर्णी, मोरागड, वडगाव आंबे, वडगाव आंबे बुद्रुक, वडगाव आंबे खुर्द येथील पाळीव जनावरांना पाणी पिण्यासाठी एकमेव जलस्रोत आहे.
परंतु या पाझर तलावाला अतिक्रमणाचे ग्रहण लागले असून याच पाझर तलावाच्या जलसाठा होत असलेल्या पाझर तलावाच्या सांडव्याच्या व भिंतीच्या मागील बाजूस गट नंबर ९५/०२ एक हेक्टर बाविस आर या एका शेतकऱ्याने मुरुम व मातीचा भराव तसेच जलसाठ्याच्या बाजूला एक मोठा माती बांध टाकून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलसाठा होत होता अश्या अंदाजे अर्धा एकर जमीनीवर अनाधिकृत ताबा घेतल्याची तक्रार वडगाव आंबे येथील जय अंबिका पाणी वापर सहकारी संस्था मर्यादित या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अरुण बाबुराव पवार यांनी मा. जिल्हाधिकारी जळगाव, मा. कार्यकारी अभियंता जिल्हापरिषद सिंचन विभाग जळगाव मा. उपविभागीय अभियंता जिल्हापरिषद सिंचन उपविभाग भडगाव, मा. तहसीलदार साॊ. महसूल कार्यालय पाचोरा यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली असून पाझर तलाव हद्दीत अनाधिकृतपणे करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी होऊन ते त्वरित काढण्यात यावे व संबंधित शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित तक्रारीची दखल घेऊन कारवाई न झाल्यास मी आंदोलन करण्यासाठी तयार आहे असे सांगितले.
अरुण पवार ~
एका बाजूला शासन पाणी आडवा, पाणी जिरवा याकरिता नद्या, नाले व इतर ठिकाणी जमेल तीथेच धरण, पाझर तलाव, नालाबांध, शेततळे, माती बांध व इतर योजना राबवण्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे. तसेच जलसाठ्यात भर पडावी म्हणून दरवर्षी धरण, पाझर तलाव, नालाबांध, शेततळे, माती बांध यांच्यातील गाळ काढण्यासाठी हजारो रुपये खर्च करून गाळ काढून जलपातळी वाढवून जलसाठा जास्तीत जास्त वाढवण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील आहे.
तर दुसऱ्या बाजूला शेरी पाझर तलावात एका शेतकऱ्याने माती व मुल्यांचा भराव टाकून पाझर तलावाच्या क्षेत्रात अतिक्रमण केल्यामुळे पाझर तलावातील जलसाठा कमी होणार असून भविष्यात आमच्या पंचक्रोशीतील गुराढोरांना तसेच नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल अशी भिती व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे जय अंबिका पाणी वापर सहकारी संस्था मर्यादित वडगांव आंबे तालुका पाचोरा हि पाणी वापर संस्था कार्यान्वीत असून संस्था पाझर पालावाची देखभाल करीत असून दर वर्षी शासन नियमानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेकडे पाणीपट्टी भरणा करीत आहे.
(अरुण बाबुराव पवार यांनी केलेल्या तक्रारीची संबंधित अधिकारी कितपत दखल घेऊन कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून खरा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी सत्यजित न्यूज लवकरच संबंधित शेत मालकाला भेटून त्यांचे म्हणणे ऐकून सविस्तर खुलासा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.)