पाचोरा ते तारखेडा रस्त्यासाठी जमिन अधिग्रहण करण्यासाठी आमदार किशोर पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०९/२०२२
तारखेडा गावाहून पाचोरा शहरातला जोडणारा
किशोर आप्पा पाटील आमदार पाचोरा भडगांव, जि. जळगाव
सदाव
५०९, आकाशवाणी, आमदार निवास, मुंबई ४०० ०३९, फोन : (०२२) २२०२२११६
निवास : सिंहगड चिंतामणी कॉलनी, भडगांव रोड, पाचोरा. जि. जळगांव फोन : ०२५९६ २४४८९९ (नि), २४०३२९ (कार्या) मो. ९४२२२८४५९९, ९८६०८९९०९१
जावक क्र. MLA /11/2022
दिनांक : २५/०७/२०२२
प्रति,
मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र !
विषय:- पाचोरा तारखेडा रस्ता प्रजिमा ३७ कि.मी. २९/९०० ते ३३/४०० या रस्त्यासाठी रेल्वे लगतची जमिन अधिग्रहण करणे बाबत.
महोदय, उपरोक्त विषयान्वये, पाचोरा तारखेडा रस्ता प्रजिमा ३७ कि.मी. २९/९०० ते ३३ / ४०० हा रस्ता सध्या रेल्वे हद्दीमध्ये असुन, भुसावळ- मनमाड रेल्वेच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरु असल्यामुळे सदरील रस्ता हा रेल्वेच्या हद्दीत असल्याने बंद होणार आहे. सदरील रस्ता हा तारखेडा, गाळण, हनुमानवाडी, चिंचखेडा, नगरदेवळा, चाळीसगांव, नागद या गावांना जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग असून, सदर गावातील नागरिकांना दवाखाना, बाजारपेठ तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना ये- जा करण्यासाठी पाचोरा व जळगांवला जोडणारा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता बंद झाल्यानंतर विद्यार्थी, नागरिकांची मोठ्याप्रमाणावर गैरसोय होणार आहे.
तरी, पाचोरा तारखेडा रस्ता प्रजिमा ३७ कि.मी. २९/९०० ते ३३/४०० या रस्त्यासाठी रेल्वे लगतची जमिन अधिग्रहण करण्याचे आदेश आपल्या स्तरावरुन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावेत हि विनंती.
आपला
(किशोर आप्पा वि.स.स पाटील)