पाचोरा तालुक्यातील भरारी पथकाकडून कृषी केंद्राची तपासणी संशयाच्या भोवऱ्यात. शासनाचे नियम व कायदे डावलून बियाणे विक्री सुरु.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील तसेच शहरातील कृषी निविष्ठा विक्रेते यांची तालुकास्तरीय भरारी पथकाकडून तपासणी करण्यात येत असून ही तपासणी करत असतांनाच आढळून आलेल्या त्रुटींबाबत संबंधितांना लेखी सुचना देऊन सर्व निविष्ठा (बियाणे, खते, किटकनाशके) शेतकऱ्यांना विक्री करतांना शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे विक्री करणे, कृषी केंद्रात विक्रीसाठी आणलेल्या सर्व बियाणे, किटकनाशके, खते याचा साठा रजिस्टर व ऑनलाईन परवाना अपडेट करुन विक्री करणे, सर्व ग्राहकांचे ओ फार्म, ग्राम प्रमाणपत्रे ऑनलाईन पध्दतीने अपडेट करणे, आपापल्या कृषी केंद्रासमोर दरपत्रक फलक लावणे व खरेदीदार ग्राहकांना पक्की बिले देऊन बिलावल सही घेण हे बंधनकारक असल्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच तालुक्यातील सर्व कृषी केंद्राची काटेकोरपणे तपासणी केली जाणार असून कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या आदेशानुसार ०१ जुन २०२२ बुधवार पासुनच कापूस बियाणे विक्री करावी तसेच बियाणे विक्री करतांना मान्यताप्राप्त दर्जाच्या बियाणांची विक्री करावी असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत व बोगस बियाणे विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी असे सुचवले आहे.
या भरारी पथकात तालुका कृषी अधिकारी मा. श्री. रमेश जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी तथा भरारी पथक सचिव मा. श्री. एम. एस. भालेराव, मंडल कृषी अधिकारी मा. श्री. एस. व्ही. जाधव, कृषी सहाय्यक मा. श्री. आर. बी. चौधरी यांचा समावेश होता.
असे असले तरी शासनाने बि, बियाणे, खते, जंतुनाशके शिकतांना बोगस बियाणे विक्री होऊ नये, अधिकृत बियाणे तसेच खते जास्त भावाने विक्री होऊ नये व ०१ जुन २०२२ बुधवार अगोदर कापूस बियाणांची विक्री होऊ नये म्हणून भरारी पथके नेमुन कडक नियमावली जाहीर केलेली असल्यावर ही आज रोजी पाचोरा तालुक्यातील गावागावातून मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग ठिबक संच वापरुन कापूस पिकाची (बियाणांची) लागवड करतांना दिसून येते आहे.
हा प्रकार पाहून शासनाच्या नियमाप्रमाणे वागणारे व आदेशाचे पालन करणारे कृषी केंद्राचे संचालक (मालक) तसेच शेतकरी वर्ग ह्या कापूस पिकांची होणारी लागवड पाहून अचंबित होत आहे. तसेच शासनाने नेमुन दिलेल्या भरारी पथकाविषयी शंका निर्माण झाल्या असून नियम धाब्यावर बसवून कापसाची लागवड करण्यासाठी ०१ जुन अगोदर या शेतकऱ्यांना बियाणे कुठुन उपलब्ध झाले असा खडा सवाल विचारला जातो असून नियम मोडणाऱ्या कृषी केंद्राची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आतातरी कारवाई होईल का ?
आज २९ मे २०२२ रविवार असून ०१ जुन पर्यंत दोन दिवसाचा अवधी भरारी पथकाच्या हातात आहे. या दोन दिवसात शेतात लागवड केले जात असलेले बियाणे कुठुन उपलब्ध झाले याचा तपास घेण्यासाठी भरारी पथकाकडून काय उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच या दोन दिवसात कृषी केंद्राची झाडाझडती घेऊन त्यांच्याकडे किती बियाणे होते व आता किती शिल्लक आहे याबद्दल सखोल निपक्ष, निस्वार्थ चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र याकरिता गरज आहे ती इच्छाशक्तीची विशेष म्हणजे तालुक्याच्या ठिकाणाहून तसेच ग्रामीण भागातील काही धनदांडग्या कृषी केंद्रावरुन बियाणे विक्री झाले असल्याचे सांगितले जाते आहे.
सविस्तर माहिती जाणून घ्या पुढील भागात
(आंधळ दळतय अण कुत्र पिठ खातय.)