हरियाणा राज्यात हिंदू समाजाच्या ब्रजमंडल शोभायात्रेवर झालेल्या हल्ल्याचा, पाचोरा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे जाहीर निषेध.
थेदिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०८/२०२३
हरियाणा राज्यातील नूह येथे सोमवार दिनांक ३१ जूलै २०२३ सोमवार रोजी हिंदू समाजातर्फे ब्रजमंडल शोभायात्रा काढण्यात आली होती. ही शोभायात्रा शांततेत पार पडत असतांनाच काही कट्टरवाद्यांनी पूर्वनियोजित पध्दतीने अडवणूक करुन ब्रजमंडल शोभायात्रेवर दगडफेक करत हल्ला चढवला या हल्ल्याची तीव्रता एवढी मोठी होती की या कट्टरवाद्यांनी केलेल्या पूर्वनियोजित हल्यात पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला. यामुळे या ब्रजमंडल शोभायात्रेत सामील झालेल्या महिला व पुरुष जखमी झाले आहेत.
हे कट्टरवादी समाजकंटक हल्लेखोर येथेच थांबले नाहीत तर या ब्रजमंडल शोभायात्रेत बंदोबस्त कामी असलेल्या होमगार्ड व पोलिसांवर हल्ला चढवला या हल्ल्यात दोन होमगार्ड मृत्यूमुखी पडले तर दहा पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले आहेत. तसेच या हल्ल्यात डझनभर वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. हिंदू धर्मातील अनुयायी शांततेच्या मार्गाने आपले सण, उत्सव साजरे करत असतांना हे कट्टरवादी समाजकंटक आमच्या चांगुलपणाचा फायदा घेत पूर्वनियोजन करुन हल्ले करत असतात व आजही हल्ले केले जात असल्याने हा आमचा विश्वासघात केला जात असून देशातील शांततामय वातावरणाला गालबोट लागत आहे.
म्हणून अश्या कट्टरवादी समाजकंटकाचा कायमस्वरूपी बीमोड करण्यासाठी यांच्यावर कठोरात, कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तसेच झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाचोरा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे आज निषेध रॅली काढून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेधार्थ घोषणाबाजी करत पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांना निषेधाचे निवेदन देत कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निषेध रॅली मध्ये विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री योगेश सोनार, दिपक राजपूत प्रखंड सहमंत्री बजरंगदल प्रखंड संयोजक बंटी पाटिल योगेश पाटील प्रचार प्रसाद प्रमुख राहूल पाटील जय बागुल गीतेश गुजाळ भावेश राजपूत शुभम पाटील योगेश महाजन विशाल विशाल सोनवणे ललित पाटील राजेंद्र चव्हाण शुभम चौधरी दिनेश चौधरी सचिन पाटील स्वप्नील पाटील भगवान भोई दिलीप भोई राहुल सोनवणे गौरव राजपूत सौरव पाटील योगेश हटकर अमोल राजपूत शुभम जाधव चेतन हटकर शुभम नागणे आकाश शेळके संजय पवार विशाल मोरे अजय जाधव दिनेश पाटील भगवान जाधव जितेंद्र गोपाळ कोळी स्वप्नील भोई राहुल बोरसे धीरज जाधव शुभम थोरात कैलास पाटील गौरव कोळी युवराज जाधव रोहित पाटील बंटी पाटील हे उपस्थित होते.