Monthly Archives: July 2023
-
पितांबर सपकाळे यांनी लांडोराला दिले जीवदान.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१/०७/२०२३ पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव शिवारात एका लांडोर पक्षाला पितांबर सपकाळे यांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून जीवदान दिले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पितांबर सपकाळे हे अनिल पाटील (वाघ) यांच्या शेतात कामासाठी गेले होते. शेतात काम करत असतांनाच एक लांडोर काही कुत्र्यांच्या तावडीत सापडला असल्याचे दिसून आले. हे ... -
शेंदुर्णीसह परिसरातील गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/०७/२०२३ जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांनी हजेरी लावल्यापासून पहुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावागावातून अवैध धंदे बंद करण्यासाठी झाडाझडती सुरु केली आहे. ही मोहीम राबवत असतांनाच दिनांक २८ जूलै २०२३ शुक्रवार रोजी शेंदुर्णी पोलीस चौकीच्या हद्दीतील जंगीपुरा गावालगतच्या गोगडी नदीच्या काठावर मोकळ्या जागेत एक इसम कोणत्यातरी मादक ... -
बेटी बचाव बेटी पढावचा विद्यार्थिनींनी दिला नारा पथनाट्यातून केली जनजागृती.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/०७/२०२३ पाचोरा तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ आणि श्री. गो. से. हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने “बेटी बचाओ बेटी पढावो” अभियानांतर्गत पाचोरा शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीतून आणि संघर्ष गाथा या पथनाट्यातून शालेय विद्यार्थिनींनी “बेटी बचाव बेटी पढाओ” अशा घोषणा देत जनजागृती मोहीम मोहिमेत सहभाग नोंदविला. कायदेविषयक विधी साक्षरता शिबिर कार्यक्रमांतर्गत सकाळी नऊ ... -
लाखो की आमदानी हजारो मे तोडी पानी होत असल्याने अवैध धंदे व भ्रष्टाचारात वाढ.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०७/२०२३ (लाखो की आमदानी, हजारो मे तोडी पानी होत असल्याने अवैध धंदे व भ्रष्टाचारात वाढ होत असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.) काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या कृषी विभाग व आपत्ती व्यवस्थापनच्या आढावा बैठकीत पालकमंत्री मा. श्री .गुलाबराव पाटील व ग्रामविकासमंत्री मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे आमदार मा. श्री. मंगेशजी चव्हाण, आमदार मा. ... -
एस. टी. च्या वाहक, चालकाच्या मनमानीमुळे, मालखेडा येथील सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी सहा किलोमीटर पायपीट.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०७/२०२३ (सोयगाव ते अमळनेर एस. टी. बसमध्ये दिवटीवर एक महिला वाहक (कंडक्टर) अधुनमधून येत असते ही महिला वाहक बसमध्ये जागा उपलब्ध असल्यावरही बस थांब्यावर बस थांबवत नाही व थांबवलीच तर ही महिला वाहक विद्यार्थ्यांना दमदाटी व शिवीगाळ करते अशी तक्रार मालखेडा येथील विद्यार्थ्यांनी केली असून अशा मगरुर महिला वाहकावर कारवाईची मागणी केली आहे. ... -
पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी शेतकऱ्यांची वणवण.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०७/२०२३ काल राजस्थान येथुन एका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या चौदाव्या हप्त्याची २०००/०० रुपयांची रक्कम बँक खात्यावर जमा झाली. याबाबत आजुबाजुच्या शेतकऱ्यांकडून रक्कम जमा झाल्याचे समजल्यामुळे व ज्याच्याकडे मोबाईलवर संदेश आलेला नाही अशा प्रत्येक शेतकऱ्याने बँकेमध्ये जाऊन पडताळणी केली परंतु रक्कम जमा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तहशिल कार्यालयात संपर्क साधला परंतु तेथे गेल्यावर ... -
न्यायालयासमोर गौरक्षक हेमंत गुरव यांच्या प्रकरणात मानवी हक्क आयोगाने निष्कर्ष नोंदवल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याचे पितळ उघडे.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०७/२०२३ गुरांच्या अवैध वाहतुकीच्या गुन्ह्यांमध्ये पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी चुकीच्या पध्दतीने कारवाई त्यांच्याच अंगलगट आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील गौरक्षक मा. श्री. हेमंत गणेश गुरव यांनी सन २०२२ मध्ये अवैधरित्या अमानुषपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली ... -
अंबे वडगाव गावाजवळ ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराने पाय गमावले.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०७/२०२३ पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावाजवळ अंबे वडगाव ते वरखेडी रस्त्यावर पाचोऱ्याकडून येणारा ट्रक क्रमांक यु. पी. ७० एफ. टी. ६४८१ या ट्रक चालकाने अंबे वडगावकडून पाचोऱ्याकडे एम. एच. २० एफ. एल. ३८७० हा क्रमांक असलेल्या दुचाकीवरुन जाणाऱ्या दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वाराचे दोघही पाय पुढील टायर खाली आल्यामुळे दोघ पायाचे ... -
पीक विमा व लाल्या रोगाविषयी शेतकऱ्यांना माहिती आसावी, कृषी पर्यवेक्षक मा. श्री. के. एफ. पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०७/२०२३ शेतकऱ्यांना माहिती आसावी. अधिक माहितीसाठी संपर्क. कृषी पर्यवेक्षक मा. श्री. के. एफ. पाटील. भ्रमणध्वनी क्रमांक. ८६०५११८८८८ १)क्लोरमेक्वाट क्लोराईड वाढ निंयञक २)एन ए. ए. नैसर्गीक गळ थांबवीणे ३)जि ए. पेशीची संख्या वआकार वाढविणे ४)नायट्रोबेंझीन, कळी व फुले काढणे ५)टायकंटेनाॅल, प्रकाश सश्लेषण वाढविणे. ६)ह्युमिक ॲसिड ६%, सुपीकता वाढविणे, ७)ह्युमिक ॲसिड १२ %वर पाढ-या मुळाची ... -
सत्यजित न्यूजची दखल घेत जरंडी प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली बहुलखेडा गावात झाडाझडती.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०७/२०२३ सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा या गावात मागील काही वर्षांपासून एक बोगस डॉक्टरने कोणताही फलक न लावता आपला दवाखाना थाटून दवाखान्यात बिनधास्तपणे ॲलोपॅथी औषधांचा वापर करुन उपचार करत होता. ही बाब बहुलखेडा या गावातील काही सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सत्यजित न्यूज पाचोरा यांच्याकडे नाव न सांगण्याच्या अटीवर तोंडी तक्रार करुन या बोगस डॉक्टरांची ...