Yearly Archives: 2023
-
हा जन्म रे वेड्या पाण्याचा बुडबुडा, कशाला घालतोय स्मशानभूमीच्या बांधकामात खोडा संबंधितांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/१२/२०२३ -
रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिलीप पाटील यांनी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत मांडल्या विविध समस्या.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/१२/२०२३ आज दिनांक २९ डिसेंबर २०२३ शुक्रवार रोजी पाचोरा येथे रेल्वे सल्लागार समितीची १७१ वी बैठक रेल्वे प्रशासनाचे डी. एम. आर. पांडेजी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिलीप पाटील यांनी रेल्वे बाबतीत येणाऱ्या तसेच प्रवाशांच्या विविध समस्या लक्षात आणून देत त्या सोडविण्यासाठी उपाययोजना करता येतील याबाबत ... -
पहुर पोलीस स्टेशनला गावठी हातभट्टी विक्रेत्यावर एम. पी. डी. ए. अंतर्गत जिल्ह्यातील पहिली कारवाई.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/१२/२०२३ जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप हे रुजू झाल्यापासून त्यांनी लगेचच अवैध धंदे करणारांची कुंडली काढून सट्टा, पत्ता, जुगार, गावठी दारुची निर्मिती व अवैध विक्री करणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबवून अवैध धंदे करणारांचे कंबरडे मोडण्यासाठी सतत कार्यरत आहेत. आता नुकतेच पहुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे चिलगाव येथील ... -
मीशोच्या डिलीव्हरी बॉयची ऑनलाईन वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांशी अरेरावीची भाषा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/१२/२०२३ सद्यस्थितीत ऑनलाईन वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे ग्राहकांना वेळेवर हवी ती वस्तू बाजार किंमतीपेक्षा वाजवी दरात घरबसल्या उपलब्ध होत असल्याने वस्तू खरेदीसाठी जाण्यायेण्याचा खर्च व वेळ वाचत असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील लोकही मीशो या कंपनीच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून विविध वस्तू खरेदी करतांना दिसून येत आहेत. संबंधित ग्राहकाने ... -
अंबे वडगाव गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला, डासांच्या निर्मूलनासाठी धूर फवारणीची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/१२/२०२३ हिवाळा सुरू होताच पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गाव परिसरात डासांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी या गावात त्वरित धूर फवारणी करावी, अशी मागणी अंबे वडगाव गावातील नागरिकांनी केली आहे. हिवाळा हा डासांचा प्रजननाचा काळ असतो. या कालावधीत डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. अंबे वडगाव गावात मलेरिया, डेंगू सारख्या आजाराची ... -
पाचोरा येथे समता सैनिक दलाची आढावा बैठक संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/१२/२०२३ समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक आयु. किशोर डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पाचोरा, भडगाव, पारोळा, सोयगाव तालुक्यातील प्रमुख प्रचारकांच्या उपस्थितीत पाचोरा येथे दिनांक १६ डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीत १० डिसेंबर रोजी झालेल्या समता सैनिक दलाच्या तीन दलांचे ऐतिहासिक एकत्रिकरण व संघटनेच्या घडामोडीं संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच ... -
रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांच्या कानशिलात भडकावली, पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/१२/२०२३ सद्यस्थितीत पाचोरा शहरातील वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळ्या घटना घडत असून मागील दोन महिन्यांपासून एका नामांकित डॉक्टरांच्या दवाखान्यात बरेच वादळ निर्माण झाले होते. आता नुकतेच दिनांक २१ डिसेंबर २०२३ गुरुवार रोजी पाचोरा शहरातील नामांकित डॉक्टर मुकुंद सावनेरकर हे सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या दवाखान्यात ओ. पी. डी. मध्ये रुग्ण तपासणी करत असतांना शिंदाड ... -
लग्नसमारंभात सामील झालेल्या वऱ्हाडीची, दैवयोग मंगल कार्यालयापासून दुचाकीची चोरी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/१२/२०२३ पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावर रेल्वे पुलाच्या जवळच असलेल्या दैवयोग मंगलयात आज एका विवाह सोहळ्याप्रसंगी वऱ्हाडी मंडळी लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात मग्न असल्याचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील भावेश अमरचंद बाफना हे पाचोरा येथील दैवयोग मंगल ... -
पिंपळगाव हरेश्वर येथील गोठाणपुरा परिसरातील जुगाराच्या अड्ड्याचा दहा खेड्यात नावलौकिक.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/१२/२०२३ पाचोरा तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी पाचोरा तालुक्याचे माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांना आमसभा घेण्यासाठी सांगितले आहे. याच सोबत पाचोरा, भडगाव तालुक्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून गावागावात, खेड्यापाड्यात अवैध धंदे तसेच वाळु माफिया, गौण खनिज उत्खनन व ... -
जावयाने दिली मावस सासऱ्याला जीवे मारण्याची धमकी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२१/१२/२०२३ घटस्फोट झाल्याचा राग येऊन जावयाने मावस सासऱ्याला तु मला जिथे सापडशिल तेथे मी तुला मारुन टाकेल अशी धमकी भ्रमणध्वनीद्वारे दिल्याची घटना पाचोरा तालुक्यातील कोकडी तांडा येथे घडली असून या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला धमकी देणाराच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की वरसाडे तांडा येथील रहिवासी लुकडुदास ...