साले ये मच्छर रातभर सोने नही देते, ट्रान्सफॉर्मर जळाल्याने कोल्हे गावात अंधाराचे साम्राज्य.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०२/२०२३
पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावाचा पाणीपुरवठ्यासाठी असलेला ट्रान्सफॉर्मर सुरक्षित आहे. मात्र विद्युत बिलाच्या थकबाकी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे गावठाणाचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मागील तीन ते चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाला असून संपूर्ण गाव अंधारात आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर विद्युत वितरण कंपनीकडून त्वरित ट्रान्सफॉर्मर देण्यात आला मात्र आणलेला ट्रान्सफॉर्मर बसवून झाला त्यातून विद्युत पुरवठा सुरु करताच तोही नादुरुस्त निघाल्याने कोल्हे गाव आजपर्यंत अंधारात आहे. तसेच आज पुन्हा नवीन म्हणजे दुसरा ट्रान्सफॉर्मर आणला परंतु तोही नादुरुस्त असल्याचे सांगितले जात आहे म्हणून कोल्हे गावचे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
मागील चार दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर जळाल्याने ग्रामस्थांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे. यात महत्त्वाची अडचण म्हणजे कोल्हे जवळ धरण असून गावाजवळून नांदूळ नदी वाहते या नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबला असून ठिकठिकाणी मोठमोठे शेवाळ युक्त डबके साचले आहेत या डबक्यावर असलेले डास रात्रीच्या अंधारात गावकऱ्यांना झोपू देत नाही. कारण विद्युत पुरवठा खंडित असल्याकारणाने घरातील हवेचे पंखे बंद पडले आहेत. तसेच या गावातील रहिवासी सर्वसाधारण परिस्थितीत जीवन जगत असल्याने प्रत्येकाला मच्छरदाणी घेणे सहजासहजी शक्य नाही. पिठाची गिरणी बंद असल्याने दळण वळण्यासाठी अटलगव्हान, पिंपळगाव हरेश्र्वर, पिंप्री किंवा अंबे वडगाव येथे पाच किलोमीटर अंतरावर जावे लागत आहे.
तसेच गावालगतच नदी असल्याने या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात धामण, विषारी साप हे केव्हाही गावात आढळून येतात या भितीमुळे तसेच मोठ्या प्रमाणात डासांचा ग्रामस्थांना त्रास होत असल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागते आहे. म्हणून “साले ये मच्छर रातभर सोने नही देते” हा डायलॉग कोल्हे ग्रामस्थांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.
म्हणून विद्युत वितरण कंपनीकडून आम्हाला त्वरित नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून मिळावा अशी मागणी जोर धरत आहे.