काल झालेल्या वादळी सात गावातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०४/२०२४
पाचोरा तालुक्यात काल दिनांक ११ एप्रिल २०२४ गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे वडगाव आंबे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक, डांभुर्णी, पिंप्री, कोकडी तांडा, वडगाव जोगेच्या शिवारातील मका, दादर, उन्हाळी बाजरी व इतर रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात, लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
काल अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे वरील गावातील शेतकरी हतबल झाला असून वडगाव आंबे बुद्रुक येथील भंगी पदम राठोड या दिव्यांग शेतकऱ्याचे व त्यांच्या धर्मपत्नी सौ. रुख्मिणीबाई भंगी राठोड याचे मका, दादर व उन्हाळी बाजरीचे पीक नष्ट झाले असल्याने तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.