गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा कवी कुसुमाग्रज यांच्या शब्दातून.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनांक~०९/०४/२०२४
*गुढीपाडवा*
पी. पी.पाटील. सर.
जुनी तशी रोजची
झुंजूमुंजू पहाट झाली.
हर्षीयला चराचर
साद नाविन्यानं दिली..
लय तापला ऊन्हाळा
गेली करपुन पाने.
पुन्हा कोकीळेच्या गळा
नवचैतन्याचे गाणे.
जाते कोमेजून लया
पुन्हा होतेचना ताजी.
मनामनात धुमारे
नववर्षाले राजी.
रोज नवीच जखम
कशी येते भडभडून.
जुनी हरपली सय
पुन्हा येते उफाळून.
आम्ही प्रलयाचे भक्ष
आसमानी सुलतानी…
आमुच्या ध्येयाले ना-सिमा
आमची आशा मोठी ईमानी….
दिगंताच्या दहा वाटा
घेती ऊतार चढन.
हासू चेहऱ्याच उसन
आत मनात कुढन.
नव वर्षाचा पाडवा
सण झालाना बा जागे.
बांधा आनंदान गुढ्या
राहा स्वागताले ऊभे.
*गुढीपाडवा*
नव वर्षाच्या नव शुभेच्छा…!
कवी- अरुणाग्रज (शिंदाडकर)
९५२७१६१६२६
Download WordPress Themes Nulled and plugins.