दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१०/२२२

*शिरसमणी येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शाखा स्थापन
पारोळा तालुक्यातील भोंडण येथून गिरणा धरणाचा पाट वाहत असतो व या पाटाला भोंडण पासून जोडून पुढे शिरसमणी येथील जवळपास ७०% क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे तसेच शिवारातील पाणी पातळी वाढणार आहे. असे असल्यावर सुध्दा शिरसमणी येथील शेतकऱ्यांना गेली सात ते आठ वर्षांपासून सदर काम ६०% होवून ही अपुर्ण अवस्थेत पडले असून यामुळे शेतकरी बांधवांचे खुप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आणि होत आहे,या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करावे लागेल असे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी प्रतिपादन केले.


(कृपया सबस्क्राईब करायला विसरु नका ही विनंती)

पुढे बोलतांना श्री देवरे यांनी सांगितले की,जोपर्यंत शेतकरी एकजूट होत नाही तोपर्यंत शेतकरींचे कामं मार्गी लागणार नाही हे अटळ सत्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संघटीत केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे यावे असे आवाहन केले ते शिरसमणी येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेहू शाखेचे उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी केले.याप्रसंगी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शिरसमणी गावात शाखा स्थापन करण्यात आली.

शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून सचिन कैलास पाटील, कार्याध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर धर्मा माळी, उपाध्यक्ष म्हणून समाधान युवराज पाटील, सचिव म्हणून मनोहर धनराज पाटील, खजिनदार म्हणून विशाल सुभाष पाटील, आरोग्य प्रमुख म्हणून कमलेश शांताराम माळी यांची निवड करण्यात आली. यावेळी निवड झालेल्या शाखा कार्यकारणीचे स्वागत करण्यात आले.

या शाखा स्थापनेच्या वेळी योगेश पाटील, समाधान पाटील,समाधान संतोष पाटील, आनंदराव पाटील,दिलिप पाटील, दिगंबर महारू पाटील, बळीराम पाटील, सुरेश पाटील, विनोद पाटील, योगेश देसले, दिपक पाटील,कैलास पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन पाटील यांनी मानले.