चिंचपूरे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात पारडी ठार.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
-
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील चिंचपूरे शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून दिनांक सहा मार्च रविवारी रात्री चिंचपूरे शिवारात गणेश प्रकाश पाटील. यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या एक वर्ष वयाच्या पारडीवर बिबट्याने हल्ला केला यात पारडी ठार झाली असून शेतकऱ्याचे अंदाजे चारहजार रुपये नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्याने सांगितले
चिंचपूरे शिवारात बिबट्या आला असल्याने शेतकरी व शेतमजूर धास्तावला असून शेतात कामासाठी मजूर येत नसल्याने हाती आलेले पिक कापणी, काढणीची कामे खोळंबली असून निंदणी, खुरपणी व इतर शेती मशागतीची कामे करणे गरजेचे असल्याने वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा व संबंधीत शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.