वरखेडी भोकरी येथील श्री. गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशन कंपनीच्या गोदामाला आग.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०५/२०२४
पाचोरा तालुक्यातील वरखेडी, भोकरी येथून जवळच असलेल्या सावखेड रस्त्यावरील श्री. गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशन कंपनीच्या बारदाण ठेवलेल्या गोदामाला आज सायंकाळी साडेपाच चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग लागल्याबरोबर फॅक्टरीतील इसमांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधला व घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पाचोरा नगरपालिकेचे दोन, भडगाव नगरपालिकेचा एक व शेंदुर्णी नगरपंचायतीचा एक अग्निशामक बंब काही वेळातच हजर झाले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे. परंतु आग कशामुळे लागली व आगीने इतके उग्र रूप धारण करेपर्यंत फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी कोणत्याही प्रकारची तसदी घेतली नसल्याने या आगीत लाखो रुपयांचे बारदान व धान्य जळून खाक झाले आहे. घटनास्थळी फॅक्टरीचे व्यवस्थापक नसल्याने खरा प्रकार काय आहे हे समजू शकले नाही.
(सविस्तर वृत्त फॅक्टरीचे मॅनेजर यांना भेटल्यावर लवकरच प्रसिदीस दिले जाईल.