महाविकास आघाडीला जोरदार धक्का, अनिल दादा यांची यशस्वी शिष्टाई, उद्या राष्ट्रवादीची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०५/२०२४
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत दररोज नवनवीन घटना घडत आहेत. या निवडणुकीत जळगाव मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये चुरशीची लढत होतांना दिसून येत आहे. या निवडणुकीत आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या मोठ, मोठ्या नेत्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आज महायुतीच्या प्रचार सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांची पाचोरा येथे आले होते. ते येणार की नाही, सभेला प्रतासाद मिळणार की नाही अशा अनेक अफवा महाविकास आघाडीकडून परसवण्यात आल्या होत्या. परंतु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस हे ठरलेल्या वेळेवर आले त्यांनी महाविकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला सभेला चांगला प्रतिसादही मिळाला व ते जाता, जाता करामत करुन महाविकास आघाडीला जोरदार धक्का देऊन गेले आहेत.
ठरल्या वेळेप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेद्रजी फडणवीस व मान्यवरांनी आपल्या भाषणातून मतदार राज्याच्या समोर सत्य परिस्थिती सांगून महाविकास आघाडी आम्हाला बदनाम करण्यासाठी कसे खोटे बोलत आहे हे स्पष्ट करुन दिले. सभा आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेद्रजी फडणवीस यांनी थेट माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या निवासस्थानी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व संजय नाना वाघ यांच्याशी बंद द्वार गुप्त बैठक घेऊन या बैठकीत चर्चा करतांना मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल दादा पाटील यांची शिष्टाई कामी आली व संजय नाना वाघ याचे मतपरिवर्तन करण्यात यशस्वी झाल्यानंतर लगेचच उद्या दिनांक ०९ मे २०२४ गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता समर्थ लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या बंद द्वार चर्चेच्या वेळी आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार मंगेश दादा चव्हाण, महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांची उपस्थिती होती. या बंद द्वार भेटीनंतर पाचोरा तालुका व जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला असून चर्चेला उधाण आले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय सहभागामुळे महायुतीचे पारडे अधिकच जड झाले आहे.