लोकसभा मतदारसंघाच्या विकासाबाबत व्हिजन काय ? या रोटरी क्लबच्या कार्यक्रमाला करण पवारांची दांडी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०५/२०२४
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगाव रोटरी क्लबच्या माध्यमातून जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ व प्रतिस्पर्धी महाविकास आधाडीचे उमेदवार करण पवार यांना आमंत्रित करुन दोघेही उमेदवारांना समोरासमोर बसवून मतदारसंघाच्या विकासाबाबत आपले व्हिजन काय आहे ? याबाबत सविस्तर चर्चा करुन त्याचे मत जाणून घेत ते मतदारांसमोर आणण्यासाठीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रोटरी क्लबच्या माध्यमातून दोघा उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले होते.
https://whatsapp.com/channel/0029VaCyX3R84OmFCPMT1n2E
परंतु रोटरी क्लबच्या दिलेल्या वेळेवर जळगाव लोकसभाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ या आवर्जून हजर राहून त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत मतदार संघातील नागरिकांशी दिलखुलासपणे संवाद साधला मात्र बराच वेळ वाट पाहूनही महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार हे उपस्थित न राहिल्याने त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याचे लक्षात आल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक तर्कवितर्क बांधले जाऊ लागले असून महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार हे महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या समोर थेटपणे येण्यास टाळाटाळ करत असल्याने ते आत्तापासूनच घाबरले की काय ? अशी कुजबूज रोटरी क्लबच्या कार्यस्थळी उपस्थित असलेल्या मध्ये रंगली होती.
तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे संजय सावंत यांनी भुमिका मांडली यावेळी गणी मेमन, सरिता कोल्हे, मुनीरा मॅडम व्यासपीठावर उपस्थित होत्या.