खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारांची माहिती सादर करण्याचे आदेश पण बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई कधी ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०५/२०२४
पाचोरा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घातला असून ते सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. हा जीवघेणा गंभीर प्रकार असला तरी शासन व प्रशासन या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करत नसल्याने दरदिवशी नवनवीन बोगस डॉक्टरांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यात विशेष बाब म्हणजे काही तरुणांनी दुसऱ्या प्रांतातून आणून तसेच वेगवेगळे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून तर काही तरुणांनी फक्त आणि फक्त अनुभवाच्या आधारावर ग्रामीण भागात जागा मिळेल तेथे दवाखान्याची पाटी लावून दवाखाने थाटले आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास मुन्नाभाई एम. बी. बी. एस. डॉक्टरांनी ॲलोपॅथी औषधांचा वापर करुन रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडला आहे.
आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यवसाय करणारांची चौकशी सुरु झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या चौकशी कामी ज्या, त्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मिळालेल्या सुचनेनुसार आपल्या कार्यक्षेत्रात खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारांची संपूर्ण माहिती संकलित करुन वरिष्ठांकडे पाठवण्याचे सांगितले असल्याने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व खासगी वैद्यकीय व्यवसाय करणारांना नोटीस बजावून माहिती मागितली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
यात खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्य करणाऱ्या व्यावसायीक डॉक्टरांनी त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करणे बाबत ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र, वैद्यकीय शैक्षणिक पदवी प्रमाणपत्र, वैद्यकीय शैक्षणिक महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन नोंदणी प्रमाणपत्र, वैद्यकीय शैक्षणिक महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन नोंदणी प्रमाणपत्र मुदत संपलेली असल्यास नव्याने नूतनीकरण केलेल्या प्रमाणपत्राची प्रत, आयुर्वेद, होमिओपॅथीक, युनानी शैक्षणिक आहर्ता असलेले वैद्यकीय व्यावसायीक तसेच या व्यतिरिक्त ॲलोपॅथी (मॉडर्न मेडिसीन) प्रॅक्टिस करत असल्यास सी. सी. एम. पी. (Certificate Course in Modern Pharmacology) कोर्स केलेला असल्यास ते प्रमाणपत्र, मुंबई नर्सिंग नोंदणी वैद्यता प्रमाणपत्र अशी संपूर्ण प्रमाणित कागदपत्रांच्या छायांकित प्रत सात दिवसांच्या आत आपल्या अखत्यारीत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
******************************************************************
बोगस डॉक्टरांच्या पायाखालची वाळू सरकली. बचावासाठी रथी, महारथींंची मनधरणी.
******************************************************************
वरिष्ठांच्या आदेशानुसार प्राथमिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले कामकाज सुरु केले असून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना नोटीस बजावून माहिती मागितली आहे. मात्र ही देण्यासाठी पात्र नसलेल्या काही खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी रथी, महारथींच्या दारात घिरट्या घालून स्वताला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत तर काही बाहेरगावी निघून गेले असल्याचे दिसून येते.
(प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असली तरी अजूनही बरेचसे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना आजपर्यंत नोटीस देण्यात आलेली नाही. तर काहींनी नोटीस घेण्यासाठी नकार देत टाळाटाळ केली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून अशा पळवाट काढणाऱ्या सगळ्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची चौकशी करुन जे बोगस असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे.
सुचना ~ वैद्यकीय व्यवसाय करणे हा पैसा कमावण्यासाठी आहे असा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून काही बोगस डॉक्टर दिवसाढवळ्या दवाखाने थाटून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ, खेळत आहेत. ही बाब काही सुज्ञ लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करुनही फायदा होत नसल्याने काही सुज्ञ व जागरुक नागरिकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भेटून या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती व आजही आहे.
या अनुषंगाने सत्यजित न्यूजने वारंवार आवाज उठवला असून बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी म्हणून सर्वसामान्य जनतेच्या मतानुसार वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र काही बोगस डॉक्टर आपले गुपीत उघड होऊ नये म्हणून काही लोकांना हाताशी धरुन एकतर वैयक्तिक वादाचे कारण पुढे करत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत याची सर्वसामान्य नागरिकांनी नोंद घ्यावी.