पवार माध्यमिक विद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०१/२०२३

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील कै. भिवसिंग फत्तू (नाईक) पवार माध्यमिक विद्यालय व कै.बाबुराव गुरदाल नाईक पवार उच्च माध्य.विद्यालय व कै. बाबुराव गुरदाल पवार प्राथमिक विद्यालयात काल दिनांक २६ जानेवारी २०२३ गुरुवार रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी नाशिक विभागस्तरीय मैदानी स्पर्धेतील विजयी खेळाडू कु. सपना राठोड हिच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन, कु. कोमल शेरावते हिच्या हस्ते संविधान पूजन करुन अंबे वडगाव येथील बी. एस. एफ. जवान मा. श्री. समाधान देवरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर स्काऊट/गाईड ध्वजारोहण पार पडले. तसेच इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या वर्गातील गुणवंत विद्यार्थी गौरव व क्रिडा क्षेत्रातील विजयी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडला.

हा कार्यक्रम मा. श्री. प्रल्हाद देवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. अरुणसिंग बाबुसिंग इसलावत (श्री. अरुण भाऊ पवार) तसेच गांव व पंचक्रोशीतील नागरिक, संस्थेचे सचिव श्री.प्रदीपसिंग अरुण पवार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या