शायनिंग स्टार शाळेत आनंद मेळावा अतीउत्साहात साजरा.
औरंगाबाद (प्रतिनिधी)
दिनांक~२५/१२/२०२२
आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वर द्वारे संचलीत शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक शाळेत दरवर्षी प्रमाणे आनंद मेळावा अती उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पाडण्यात आला. या आनंद मेळाव्याचे फित कापुन दौलबादचे माजी सरपंच पवन गायकवाड यांनी रितसरपणे उद्घाटन केल, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेच्या अध्यक्षा सैय्यद फैमुन आणि संस्थेच्या सचिव अमरीन खान या उपस्थित होत्या. शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेळी दुकाने थाटुन त्यात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ सजवलेले होते. पुरी भाजी, सॅनडविच, समोसा, गुलाब जामुन, लबदे, पाणी पुरी, भजे, टिकीया, भेळ, निंबू सरबत, चहा कॉफी इडली, वडा पाव, डोसा, म्युवनिस, स्माईली व वेगवेळया फळांची स्टॉल अशा अनेक मेनुनी संपुर्ण परीसर नटलेला होता, तर याचा आस्वाद विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील काही नागरीकांनी खरेदी करुन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर घालण्यात मदत केली व खुप मोठ्या प्रमाणात प्रत्येक दुकानादाराचा व्यवसाय झाल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थी आणि शिक्षक भारावुन गेले होते.
यांनर शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्वांना आनंद मेळाव्यात चांगल्या प्रकराचे प्रदर्शन केल्याबददल अभिनंद करुन या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान देण्याचा हुते लपलेला असतो व विद्यार्थ्यांना दुकान चालवुन आपले पालक पैसे कसे कमवत असतात आणि कशा प्रकारे परिश्रम करतात याची जानीव निर्माण होण्याचा मुख्या दृष्टीकोन असतो.
यावेळी सुत्रसंचलन वैशाली दाभाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मदिहा फातेमा खान यांनी केले. फैजीया शेख, पठाण बु-हाणा, शेख सुमैया, नंदा गोरे, कल्पना तुपे, सरीता पाटेकर, इंन्शा शेख, नंदा फुसे, शुभांगी कुलकर्णी, प्रतिक्षा बनसोडे, शेख आरीफ आदोनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.