माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतील तिरंगा एक्सप्रेसचे भव्य दिव्य स्वागत कार्यक्रम,खासदार उन्मेशदादा पाटील करणार स्वतः प्रवास.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०८/२०२२
देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्या सकाळी सात वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथून तिरंगा एक्सप्रेस निघणार आहे.
ही भव्यदिव्य सजवलेली १११२० ‘तिरंगा एक्सप्रेसचे’ जागोजागी स्वागत करायचे असून या मार्गावरील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख व कार्यकारणी सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांना विनंती आहे की सर्वांनी या तिरंगा एक्सप्रेसच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे. या ‘तिरंगा एक्सप्रेसने’ खासदार उन्मेशदादा पाटील व पदाधिकारी स्वतः प्रवास करणार आहेत.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मा. श्री. राजूमामा भोळे, महानगर अध्यक्ष दिपक दादा सूर्यवंशी, महापालिका गट नेते भगत बालाणी, जळगाव मंडल अध्यक्ष गोपाळ भंगाळे सर्व सन्माननीय जळगाव महानगर पालिका यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येईल.
तसेच पुढील प्रवासात पाचोरा भाजपा तालुका अध्यक्ष युवा नेते अमोल भाऊ शिंदे, शहराध्यक्ष रमेश काका वाणी, भडगाव भाजपा तालुका अध्यक्ष अमोल नाना पाटील, शहराध्यक्ष बन्सीभाऊ परदेशी,चाळीसगाव तालुका अध्यक्ष प्रा.सुनील निकमसर, चाळीसगाव शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वरतात्या पाटील यांच्यासह सर्व सन्माननीय जळगाव महानगर पालिकासह, पाचोरा व चाळीसगाव भाजपा नगरसेवक, सभापती आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
याप्रसंगी सर्व सन्माननीय जळगाव, पाचोरा व चाळीसगाव तहसिलदार साहेब व त्यांचे सर्व सहकारी नागरीक प्रवाशी उपस्थित रहाणार आहे.
वेळ व ठिकाण
उद्या दिनांक.१३ ऑगस्ट २०२२ जळगाव सकाळी ७/२४ वाजता
येथुन सुरूवात होईल. पुढील प्रवास व स्वागत थांबा शिरसोली सकाळी ७/३४ वाजता, म्हसावद सकाळी ७/४४ वाजता, माहेजी सकाळी ७/५७ वाजता, परधाडे सकाळी ८/०९ वाजता, पाचोरा सकाळी ८/२३ वाजता, गाळण सकाळी ८/४४ वाजता, नगरदेवळा सकाळी ८/५४ वाजता, कजगाव सकाळी ९/१४ वाजता, चाळीसगाव सकाळी १०/१८ वाजता, हीरापुर सकाळी १०/३४ वाजता आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी या तिरंगा एक्सप्रेसचे उत्स्फूर्त स्वागत करावे व आवर्जून उपस्थित रहावे.