नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील द्विवार्षिक निवडणुकीत मतदार यादीचे पुनरावलोकन करुन दोषींवर कारवाई करावी. निलेश उभाळे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०६/२०२४
आता नुकतीच नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ २०२४ ची व्दिवार्षीक निवडणुक जाहीर झाली या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा किंवा संस्थेची पत वाढावी म्हणून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालयाने मतदार यादी बनवतांना बेकायदेशीरपणे भरती केलेल्या १३ शिक्षकांचा फसव्या पध्दतीने मतदार यादीमध्ये समावेश केला असल्याचा आरोप करत संबंधित बेकायदेशीरपणे भरती केलेल्या शिक्षकांकडे अद्यापही शालार्थ ओळखपत्र नसल्याने जोपर्यंत सरकारकडून त्यांच्या देयकावर प्रक्रिया केली जात नाही तोपर्यंत ते शिक्षक बेकायदेशीर आहेत हे सिद्ध होते अशी तक्रार भोजे येथील मा. श्री. निलेश उभाळे यांनी संबंधित शिक्षणसंस्था व अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यामुळे ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील या बेकायदेशीरपणे भरती केलेल्या उत्तम भंगलाल चव्हाण, किर्तीकर जयवंत महाजन, अनिल रमेश चौधरी, सागर पांडुरंग हटकर, प्रविण सुखलाल जाधव, संकेत किशोर बडगुजर, मिनाक्षी दादाभाई गिरासे, वैशाली राजाराम महाजन, शारदा गुलाबचंद माहोर, भावना मनोहर गायधानी, प्रशांत जगदेव मालकर, संगिता मनोहर सोनवणे भाविका व्हि. जैन. यांच्या मतदार यादीचे पुनरावलोकन करुन फसव्या पध्दतीने मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट करणारांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भोजे येथील सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. निलेश नामदेव उभाळे यांनी पदनिर्देशित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नाशिक विभाग, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ, मा. जिल्हाधिकारी जळगाव, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.