वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील ३० वर्षीय महिलेचा अकस्मात मृत्यू. भाग क्रमांक एक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०६/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील माहेरवाशीण श्रीमती अरुणा खेमराज राठोड वय वर्षे अंदाजे ३० या महिलेचे काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील भगवान महादेव मंदिराच्या ओट्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती म्हणून तीला पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असतांनाच वाटेतच तीचा मृत्यू झाला असल्याचे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीअंती सांगितले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील माहेरवाशीण श्रीमती अरुणा खेमराज राठोड वय वर्षे अंदाजे ३० या महिलेचे १० वर्षांपूर्वी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर काही वर्षातच तिच्या पतीचे निधन झाले पतीच्या निधनानंतर श्रीमती अरुणा खेमराज राठोड ही महिला जळगाव येथे मिळेल ते काम करुन मोलमजुरी करत आपला उदरनिर्वाह चालवत होती.
मोलमजुरी करुन उदरनिर्वाह चालवत असतांना श्रीमती अरुणा राठोड ही अधुनमधून वडगाव आंबे येथे माहेरी येत असे काल दिनांक २९ जून २०२४ शनिवार रोजी श्रीमती अरुणा राठोड ही वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथे माहेरी आली होती. ती तीच्या माहेरच्या घरी आल्यावर घरची मंडळी शेतात कामासाठी गेलेले असल्याने तिने शेतात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली व नंतर वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील मंदिराकडे गेली होती परंतु यावेळी मंदिर परिसरात कुणीही नव्हते अशी माहिती समोर येत असून सायंकाळी काही तरुण व्यायाम करण्यासाठी मंदिर परिसरात गेले असता त्यांना एक महीला मंदिराच्या ओट्यावर झोपलेली दिसून आली.
इतक्या वेळपर्यंत ही महिला मंदिराच्या ओट्यावर कशी काय झोपली आहे ती कोण आहे हे बघण्यासाठी तरुणांनी महीलेजवळ जाऊन पाहिले असता संबंधित महिला ही आपल्याच तांड्यातील श्रीमती अरुणा राठोड असल्याची ओळख पटल्यावर त्यांनी त्या महिलेला उठवण्यासाठी प्रयत्न केला परंतु महिला प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी तांड्यात जाऊन सविस्तर माहिती दिली. त्यामुळे तेव्हा जाणकार लोकांनी जाऊन पाहिले असता श्रीमती अरुणा राठोड ही बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याचे दिसून आल्यावर भाऊ योगेश खेमराज राठोड यांच्या घरी आणले व लगेचच पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले होते.
दवाखान्यात नेल्यावर तपासणीअंती संबंधित डॉक्टरांनी अरुणा राठोड हिला मृत्यू घोषित केल्यानंतर तीचा मृतदेह घरी आणून तीच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी सुरु असतांनाच महिलेच्या काकांनी अचानकपणे काही कारणास्तव मयत श्रीमती अरुणा राठोड हिचे शवविच्छेदन करण्यासाठी तिचे शव पाचोरा ग्रामीण रुग्णालयात काल दिनांक २९ जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आणले होते. आज दिनांक ३० जून रविवार रोजी दुपारी एक वाजता पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन प्रत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले व लगेचच वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.