युवासेना कजगाव, वाडे जिल्हापरिषद गटाची महत्वाची बैठक संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०४/२०२४
आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या सुचनेनुसार आज दिनांक १२ एप्रिल २०२४ शुक्रवार रोजी पाचोरा, भडगाव मतदार संघातील युवासेना विस्तार कार्यक्रमानिमित्त कजगाव, वाडे जिल्हापरिषद गटाची युवा सैनिकांची बैठक युवासेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. जितेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, युवासेनेचे पाचोरा तालुकाप्रमुख अनिल पाटील, उपजिल्हा संघटक पुरुषोत्तम महाजन व कनाशी गावचे सरपंच शरद पाटील यांनी युवा सैनिकांशी संवाद साधून पक्ष विस्तार व बळकटीकरण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व चर्चा केली.
तदनंतर अध्यक्षीय भाषणात मा. श्री. जितेंद्र जैन यांनी युवा सैनिकांशी हितगुज साधुन मोलाचे मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख दुर्गेश वाघ व पाचोरा कार्यालयाचे प्रमुख संदिप (बबलू) पाटील यांनी आभार मानले.