सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • कर्तव्यावर असताना CRPF जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन.

  • विहिरीत पडून हरिणाचा मृत्यू; भोकरी शिवारातील घटना, वनविभागाची तत्काळ कारवाई.

  • तरवाडे येथील चौथीतील विद्यार्थिनी बेपत्ता; परिसरात चिंतेचे वातावरण.

  • पवित्र पोर्टल वेळेवर सुरू झाले असते तर गोरगरीब बेरोजगारांना न्याय मिळाला असता, शेखर पाटील.

  • मानकापूर उड्डाणपुलावरील मृत्यू अपघाताची मोठी दखल नागपूरचे आर.टी.ओ. किरण बिडकर निलंबित. पाचोरा तालुक्यातही नियमभंगाचीच पुनरावृत्ती?

कृषी विषयक
Home›कृषी विषयक›शेतकऱ्याच्या पोरांनो, केसावर फुगे विका मात्र शेती करू नका.

शेतकऱ्याच्या पोरांनो, केसावर फुगे विका मात्र शेती करू नका.

By Satyajeet News
January 14, 2023
149
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिनांक~१४/०१/२०२३

*शेतकऱ्याच्या पोरांनो*
*केसावर फुगे विका मात्र शेती करू नका*
‌ संतोष पाटील
—————————————————————-
संपूर्ण विश्वातील पहिला व्यवसाय जर कुठला असेल तर तो म्हणजे शेती, जल, जंगल, शेती या तीन गोष्टी त्या काळातील माणसाच्या जगण्याचे साधन होते या आधारावर मनुष्य जीवन विकसित झालेलं आहे, सुरुवातीची नैसर्गिक शेती त्याच्यानंतर पारंपारिक शेती आणि आत्ताची आधुनिक शेती असे स्थित्यंतरे शेती व्यवसायामध्ये आले, समस्त सजीवांसाठी जगण्याचं साधन म्हणजे शेती त्या काळातही आणि आजही आणि ही शेती कसणारा शेतकरी हा खऱ्या अर्थाने या सृष्टी वरील सजीवांचा अन्नदाता आहे, मात्र आज रोजी ह्या अन्नदात्यालाच आत्महत्या करावी लागत असेल तर ती शेती करण्यात काय अर्थ आहे, या देशात रोज ४३ शेतकरी आत्महत्या करतात त्याला अनेक असे कारण आहेत, पारंपारिक शेती आधुनिक शेतीत रूपांतरित होताना शेतीमध्ये जे अमुलाग्र बदल झाले ते बदल व शेतीविरोधी असलेले काळे कायदे, ध्येय धोरण, या सगळ्या गोष्टी शेतीच्या पचणी पडल्या नाहीत नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालं तेच तंत्रज्ञान पुढे शेतकऱ्याच्या बोकांडी बसलं, म्हणजे उत्पादन खर्च त्या पटीत निव्वळ नफा उरला नाही शेती तोट्यात गेली पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी झाला, या कर्जबाजारी शेतकऱ्याला शासनाने वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून सावरण्याचा प्रयत्नही केला मात्रही सगळी प्रणाली सदोष व भ्रष्टाचारी असल्याने शेतकऱ्यापर्यंत याचा थेट लाभ मिळाला नाही म्हणून सरकारी योजनांनी शेतकरी सावरला गेला नाही, देशात महागाईचा राक्षस चालून आला, त्यामध्ये कित्येक उद्योग नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर होते तेव्हा सरकारातील लोकांनी व्यवस्थेतील लोकांनी वेळोवेळी योग्य साह्य करून ते उद्योग वाचवण्याचा प्रयत्न केला, या उद्योगातील कर्ज बुडव्यांना अर्थसाह्य करून सरकारने उद्योगपतींना मदत केली, मात्र देशाच्या सकल उत्पन्नामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या शेतीला दुय्यम स्थान दिले शेतीवर अप्रत्यक्षरीत्या वेगवेगळे कर लादले शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा महाग केल्या ,आणि येणाऱ्या उत्पन्नाला कमीत कमी भाव देऊन शेतकरी आणि शेती नसतानाबूत केली, व्यापार, उद्योग, शहरांचा विकास, तीर्थक्षेत्र, पर्यटन, रस्ते या अशा ठिकाणी म्हणजे भ्रष्टाचार करून पैसे खायला मिळतील म्हणून भरमसाठ निधी खर्च केला, शेतीसाठी लागणारे पाणी, वीज, बीज, रासायनिक खतं, वेळेवर पतपुरवठा अस्मानी, सुलतानी संकटात मदत या सगळ्या गोष्टी शेतीला मिळाल्या नाही, एक कोटी रुपयांची जमीन असणारा शेतकरी तीन लाख रुपये उत्पन्न काढतो आणि एक लाख रुपये व्यवसायात गुंतवणारा व्यवसायिक वर्षाला तितकेच पैसे कमवून सुखाने जीवन जगतो, हा विरोधाभास पाहून शेतकऱ्यांच्या तरुण पोरांमध्ये एक वेगळा विचार रुजत आहे तो म्हणजे शेती न करण्याचा, मित्रहो मी एक शेतीनिष्ठ किसान पुत्र आहे शेती मातीवर माझा प्रचंड विश्वास आहे पण आजची परिस्थिती पाहता असं लक्षात येते हजार आडथळे पार करून कष्ट करून शेतकऱ्यांनी काढलेले उत्पन्न हे सरकार आपला नीचपणा दाखवून माती मोल भावानं खरेदी करत आहे, व्यापाऱ्यांच्या अधीन असलेले हे सत्तेतील लोक शेतकऱ्यांच्या मानगटीवर बसलेले आहेत या मस्तवाल बैलांना वठणीवर आणण्यासाठी समस्त शेतकऱ्यांच्या पोरांना विनंती करतो की, आपणही छोटासा व्यवसाय थाटावा समोर येईल ते काम करावं मात्र येणारी पुढची पिढी शेतीमध्ये येऊ देऊ नका, अर्थातच केसावर फुगे विका मात्र शेती करू नका…
संतोष पाटील
७६६६४४७११२

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 198
Previous Article

स्व. सागरमलजी कावडिया अनंतात विलीन.

Next Article

वडगाव आंबे गावातील अवैध धंदे बंद होण्यासाठी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    सत्ताधाऱ्यांची शिरजोरी, कोल्हे गावातून शौचालयाची चोरी.

    August 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    रेशनिंगचा तांदूळ पकडला यावल तालुक्यात मात्र घबराट होतेय पाचोरा तालुक्यात. सखोल चौकशी व थेट कारवाईची मागणी.

    October 30, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अंगारकी चतुर्थीला वरखेडी बसस्थानक परिसरात उघड्यावर मांस विक्री.

    January 10, 2023
    By Satyajeet News
  • कृषी विषयक

    जगा आणि जगू द्या विकास मंचच्या वतीने उद्यापासून सत्ताधारी लोकप्रतिनिधींना गाव बंदी.

    April 25, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पंतप्रधान मोदीजींच्या हत्येचा कट उघडकीस, देशभरात खळबळ.

    September 24, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    हेलीकॉप्टर अपघातात लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा मृत्यू.

    December 8, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    प्लास्टिक कॅरीबॅग बंदीला पाचोरा शहरातून खो, सगळीकडे आनंदी आनंद.

  • सांस्कृतिक

    नुतन वर्षात मानवा असे घडेल का ? (प्रासंगिक लेख किंवा बातमी स्वरूपात)

  • Uncategorized

    दिलीप वाघ उपचारार्थ मुंबईत दाखल.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज