सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) विषयाला खासदार स्मिता वाघ यांचे सकारात्मक आश्वासन; अमळनेर येथे समितीशी सखोल चर्चा.

युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) विषयाला खासदार स्मिता वाघ यांचे सकारात्मक आश्वासन; अमळनेर येथे समितीशी सखोल चर्चा.

By Satyajeet News
December 2, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२५

युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) या महत्त्वाकांक्षी विषयास केंद्र शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) समितीने जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार महोदया स्मिता वाघ (ताईसाहेब) यांची अमळनेर येथे सोमवारी (दि. १ डिसेंबर २०२५) रात्री ८ वाजता त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत सखोल व सकारात्मक चर्चा झाली.

सदर भेटीसाठी कासोदा येथील भाजप पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य श्री. नरेशदादा ठाकरे तसेच खडके येथील भाजप तालुका अध्यक्ष व सरपंच राजूदादा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत ही बैठक घडवून आणणे अवघड असतानाही दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर ही महत्त्वाची बैठक यशस्वी ठरली.

कौटुंबिक कार्यक्रमामुळे राजूदादा पाटील हे प्रत्यक्ष बैठकीस उपस्थित राहू शकले नसले, तरी त्यांनी सातत्याने संपर्क ठेवून बैठक होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) समितीचे पदाधिकारी व नरेशदादा ठाकरे यांनी मिळून खासदार स्मिता वाघ यांची भेट घेत एक सविस्तर निवेदन सादर केले.

या वेळी समितीने युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) विषयाची पार्श्वभूमी, त्याचे सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व, तसेच अपेक्षित परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. खासदार स्मिता वाघ यांनीही विषय गांभीर्याने समजून घेत समितीला विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारले. त्याचबरोबर हा विषय अधिक परिपूर्णपणे मांडण्यासाठी समितीला काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

या सूचनांची पूर्तता झाल्यानंतर समितीची केंद्र शासनाबरोबर थेट बैठक लावण्याचे आश्वासनही खासदार स्मिता वाघ यांनी दिले. त्यामुळे समितीला मोठा दिलासा मिळाला असून हा विषय केंद्र सरकारच्या पातळीवर नेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अत्यंत सकारात्मक, सौहार्दपूर्ण आणि आनंदी वातावरणात ही बैठक पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) विषयाला ठोस दिशा मिळाल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. समितीच्या या यशस्वी प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत असून, पुढील टप्प्यात केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 26
Previous Article

पाचोरा तालुक्यात विजेचा खेळ, खंडोबा; विद्युत वितरण ...

Next Article

क्षमतादेखील ओलांडलेली एस.टी; अपुऱ्या सुविधांमुळे अपघातांची साखळी, ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    सावखेडा येथील पिडीत कुंटूबीयांची जिल्हापरिषद सदस्य मधुकर काटे. यांनी घेतली भेट.

    December 10, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जिल्हाधिकाऱ्यांची यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट, राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला सखोल आढावा.

    November 27, 2025
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गरज नसतांना घरा बाहेर निघू नका , स्वताः सह इतराची काळजी घ्या , उल्लंघन केल्यास कठोर पोलिस कारवाई.(पो.नि. प्रतापराव इंगळे.)

    March 28, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पंतप्रधान कार्यालयातून खासदार रक्षाताई खडसेंना फोन, आज सायंकाळी घेणार मंत्रीपदाची शपथ.

    June 9, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथील कु.श्रुतिका प्रवीण तेली ही न.एम.एम.एस. परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांकावर.

    August 28, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोककला राहत कोष ग्राम स्वराज समिती आणि निऋती लोकार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु लोककलवांतांसाठी लोककला राहत कोष मार्फ़त जीवनावश्यक ...

    April 27, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    ठेकेदार होऊन मलिदा खाण्यासाठी उमेदवारी करु नका, गावाचा विकास साधला पाहिजे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष पितांबर सपकाळे.

  • साहित्यिक

    महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं, संतोष पाटील.

  • Uncategorized

    जळगाव जिल्ह्यात ११९४ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १४ बाधितांचा मृत्यू.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज