सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला; उच्च न्यायालयाच्या आदेशाने निर्णय, राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश.

नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला; उच्च न्यायालयाच्या आदेशाने निर्णय, राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश.

By Satyajeet News
December 2, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२५

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत होणारी मतमोजणी पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून, त्याबाबतचे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत. मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी होणारी मतमोजणी आता थेट दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी दिनांक २ डिसेंबर रोजी मतदान व दिनांक ३ डिसेंबर रोजी मतमोजणी नियोजित होती. मात्र काही नगरपरिषद व नगरपंचायतींविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे, दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रभावित संस्थांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्या कार्यक्रमानुसार मतदान दिनांक २० डिसेंबर आणि मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती.

दरम्यान, रिट याचिका क्र. WP/७५०८/२०२५ या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी स्पष्ट आदेश देत, दिनांक ३ डिसेंबर ऐवजी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजीच मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुधारित आदेश निर्गमित केले आहेत.

आयोगाने स्पष्ट केले आहे की, दिनांक २ डिसेंबर रोजी पडलेल्या मतदानानंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. याकरिता आधीच जारी केलेल्या आदेशांनुसार ईव्हीएमची योग्य हाताळणी, सुरक्षित साठवणूक, गोडाऊन व्यवस्थापन अधिकारी नियुक्ती, तसेच सीसीटीव्ही, अलार्म यंत्रणा, अग्निशमन उपकरणे, बॅरेकटिंग व २४ तास सशस्त्र सुरक्षा व्यवस्था अनिवार्य करण्यात आली आहे.

मतदान यंत्र ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनमध्ये केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याची नोंद लॉगबुकमध्ये करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याने मतदानानंतर ईव्हीएमवरील ऑन-ऑफ स्विच अचूकरीत्या बंद असल्याची खात्री निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. मतमोजणीच्या वेळी ‘लो बॅटरी’ असा संदेश आल्यास, पूर्वीच्या आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही करून मतमोजणी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी तसेच उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम साठवणूक गोडाऊनच्या सुरक्षेची पाहणी करता यावी यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उमेदवारांना गोडाऊनचे प्रवेशद्वार दिसेल अशा ठिकाणी बसण्याची सोय करण्याचेही आदेश आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तसेच नगरपालिका व नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार काटेकोर पालन करून मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, त्याबाबतचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्णयामुळे राज्यभरातील निवडणूक निकालासाठी आता दिनांक २१ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रतीक्षा वाढली असून, राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 68
Previous Article

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक : धनशक्तीसमोर जनशक्तीचे मोठे ...

Next Article

पाचोरा तालुक्यात विजेचा खेळ, खंडोबा; विद्युत वितरण ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    आम्ही मारल्यासारखे करु, तुम्ही रडल्यासारखे करा. वरखेडी येथील राज ढाब्यावर दारुबंदी अधिकाऱ्याचा छुपा आर्शिवाद,

    September 15, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    तक्रारदाराने मारला षटकार लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचा चेंडू थेट मंत्रालयात.

    June 3, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    केसरबाई रघुनाथ दांडगे या वयोवृद्ध महिलेचा जंगली श्वापदाच्या हल्यात मृत्यू झाल्याचा संशय.

    November 27, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर हातोडा, परंतु बसस्थानक व हिरव्यागार वृक्षांची कत्तल केल्याने सुज्ञ नागरिकांनी घेतला आक्षेप.

    January 28, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा शहरासह तालुक्यात बोगस पॅथोलॉजी लॅबचा सुळसुळाट, रुग्णांच्या जीवाशी खेळ.

    October 22, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    वरखेडी येथून जवळच असलेल्या मानमोडी शिवारात अनोळखी इसमाचा मृत्यू.

    April 12, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पारोळा पोलिस व वनपरिक्षेत्र पारोळा संयुक्त कारवाईत दोन कासवांना मिळाले जीवदान.

  • सांस्कृतिक

    श्री. संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त १५ फेब्रुवारी रोजी पाचोरा शहरात भव्य रॅलीचे आयोजन.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळाचा कारभार म्हणजे, आंधळ दळतंय आणि ** पीठ खातय.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज